Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर, हातकणंगलेचा टक्का गतवेळेपेक्षा एकने वाढला; तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर राज्यात अव्वल

वाढीव मतदानात कोल्हापुरातील चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal
Summary

करवीर तालुक्यात सर्वाधिक ७९.६१, त्याखालोखाल कागल तालुक्यात ७५.३१ टक्के मतदान झाले.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) ७१.५९ टक्के, तर हातकणंगलेसाठी ७१.११ टक्के मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांत मिळून सरासरी ७१.९८ टक्के मतदान झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यांत मतदान होण्याच्या सरासरीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे.

Kolhapur Lok Sabha
18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांत (Hatkanangle Constituency) एक टक्‍का मतदान वाढले असून, ते कोणाच्या पथ्‍यावर पडणार हा मात्र उत्सुकतेचा विषय ठरला आहे. वाढीव मतदानात कोल्हापुरातील चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हातकणंगलेत शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे.

Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha

उत्कंठता आणि चूरस असलेल्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत मंगळवारी (ता. ७) चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूर मतदारसंघात अंदाजे ६३.७१ तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी पाच ते सहा या एका तासातील मतदानाची आकडेवारी प्रशासनाने आज संकलित केली. त्यानंतर सायंकाळी प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली.

Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha

यामध्ये कोल्हापुरात ७१.५९ टक्के तर हातकणंगलेसाठी ७१.११ टक्के मतदान झाले. करवीर तालुक्यात सर्वाधिक ७९.६१, त्याखालोखाल कागल तालुक्यात ७५.३१ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६५.३१ इतके झाले. हातकणंगलेसाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५.३२ तर शाहूवाडी, शिरोळ मतदारसंघांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत २०१९ च्या तुलनेत एक टक्‍क्याने मतदान वाढले आहे.

Kolhapur Lok Sabha
'महायुतीचे उमेदवार नारायण राणे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील'; नीतेश राणेंना विश्वास

कोल्हापूर- २०१९ मध्ये झालेले मतदान

  • पुरुष - ६ लाख ३५हजार ३२७

  • स्त्री - ५ लाख ९२ हजार २७७

  • तृतीयपंथी - २

एकूण - १२ लाख २७ हजार ६०६

कोल्हापूर- २०२४ मध्ये झालेले मतदान

  • पुरुष - ९ लाख ८४ हजार ७३४

  • स्त्री - ९ लाख ५१ हजार ५७८

  • तृतीयपंथी - ९१

एकूण -१९ लाख ३६ हजार ४०३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com