'हे' आहेत भाजपचे 'डुप्लीकेट' जिल्हाध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

या निवडणुकीत होणाऱ्या पैशाच्या गैरवापराला येथील जनतेने भुलू नये. कोण पैशाचे आमिष दाखवित असल्यास त्याला हात लावू नका. या पैशाला रक्‍ताचा, खुनाचा व खंडणीचा वास असतो. त्यामुळे यातुन कोणाचे चांगले होणार नाही.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - प्रमोद जठार हे डुप्लीकेट भुमिका असलेले जिल्हाध्यक्ष आहे. पक्षविरोधी काम केल्याने अन्नपुर्णा कोरगावकर यांची हकालपट्टी होते तर राजन तेली यांची का होत नाही. त्यामुळे भाजप हा ढोंगी पक्ष असल्याचा आरोप माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केला. 

या निवडणुकीत होणाऱ्या पैशाच्या गैरवापराला येथील जनतेने भुलू नये. कोण पैशाचे आमिष दाखवित असल्यास त्याला हात लावू नका. या पैशाला रक्‍ताचा, खुनाचा व खंडणीचा वास असतो. त्यामुळे यातुन कोणाचे चांगले होणार नाही. आपले मत हा लोकशाहीला दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार चांगल्या तऱ्हेने वापरला गेला पाहीजे, असेही केसरकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - केसरकरांकडून केला जाणारा राणेंचा बागुलबुवा लांडगा आला रे आला सारखा 

बजावून सांगितले होते राणेंना घेऊ नका

येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. ते म्हणाले, ""ज्या भाजपमध्ये मी पाच वर्ष काम केले त्या पक्षात नारायण राणेंसारख्या प्रवृत्तीला घेऊ नका. म्हणुन वांरवार सांगत होतो. शिवाय तुमच्या पैकी जी लोके पैशाचा वापर करतात त्यांचे रूप मी समोर आणल्या शिवार राहणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते; मात्र आजही तोच प्रकार येथे होताना दिसत आहे. सत्याच्या मार्गाने शंभर वेळा लढाई जिंकण्याची माझी तयारी आहे; परंतु पैशाचा गैरवापर होता कामा नये याची दखल पक्षाच्या वरिष्ठांनीही घेतली पाहीजे. आज नगरपालिकासारखा छोटेच्या क्षेत्रात ते पैशाचा वापर केला जात आहे. निवडणुका या जनतेच्या विश्‍वासावर व स्वतः केलेल्या विकास कामावरच लढविल्या गेल्या पाहीजे. मोठ्या मोठ्या वल्गला येथे येऊन करतात; मात्र आज त्याच्याकडे असलेल्या नगरपालिकेचा विचार त्यांनी आधी करावा. वेंगुर्ले नगरपालिकेचा विकास हा भाजपच्या काळात झाला नाही. त्यामुळे आमच्या नगरपालिकेला शंभर कोटी आणण्यापेक्षा त्यांनी तो निधी वेंगुर्लेला द्यावा.'' 

हेही वाचा - VIDEO : सिंहावरुन सवारी केल्याचा फिल देणारी मोटारसायकल 

पैशाचा वापर थांबला पाहिजे यासाठी लढाई

पैशाचा वापर थांबला पाहिजे यासाठी माझी लढाई ही शेवटपर्यत असेल. जर पैसे वापरून निवडणुका लढविल्या गेल्या तर उद्या सर्वसामान्य घरातल्या माणसाने जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका कशा पद्धतीने लढाव्यात, त्यांनी कशा पद्धतीने त्यात विजय मिळवायचा, त्यामुळे लोकशाही पैशाचा वापर होणे हे लोकशाहीला मारक आहे. आज आम्ही चांगली कामे करत आहोत ती कामे तुम्ही करा. त्यामुळे शांत स्वभावाच्या, प्रगती करणाऱ्या लोकांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. 

मग निधी का नाही आणला? 

ते महणाले, "" जठार हे राजकारणात कणा नसलेली व्यक्‍ती आहे. त्यांची शंभर कोटी रूपये आणण्याची क्षमता असती तर त्यांनी इतर नगरपालिकांसाठी तो का आणला नाही आणि केंद्र सरकार असा निधी का राज्याच्या प्रस्तावाशिवाय देत नाही हे त्यांना कदापि माहित नसेल. माझा लढा आहे तो राणे विरूद्ध नाही तर राणे प्रवृती विरोधात आहे. माझा लढा निवडणुकीत होणाऱ्या पैशाच्या गैरवापराविरोधातही आहे त्यामुळे सावंतवाडीकरांनी अशा पैशाला हात लावू नये.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Kesarkar Comments On Pramod Jathar