esakal | 'ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण होईल'
sakal

बोलून बातमी शोधा

deepak kesarkar said gor grampanyat election loss in sawantwadi sindhudurg

वीस ते पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचारात उतरत नाही

'ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण होईल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने फोडाफोडी केली तसेच राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरविले. तसे शिवसेनेने केले नाही; मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचे निश्‍चित आत्मपरीक्षण केले जाईल, असे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार केसरकर म्हणाले, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघात १६ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. डिंगणे गावात काही जागा बिनविरोध झाल्या होत्या आणि गाव पॅनल लढवत होते. त्यामुळे १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शिवसेना व भाजप पुरस्कृत लढल्या गेल्या. या निवडणुकीत इन्सुली ग्रामपंचायतीत शिवसेना व भाजपला समान जागा मिळाल्या.

हेही वाचा -  गडहिंग्लजला 18 गावात सत्तांतर -

आता १५ पैकी विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप, अशा ग्रामपंचायती विजयी झाल्या आहेत. आमदार केसरकर म्हणाले, की आंबोली चौकुळ व मळगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा काठावर पराभव झाला. त्याचे आत्मपरीक्षण केले जाईल. वीस ते पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचारात उतरत नाही. सर्व लोक आपले असतात.

गावातील लोकांची ती निवडणूक असते. त्यामुळे गावात जात नाही; मात्र या निवडणूक निकालाचे आत्मपरीक्षण करत पुढच्यावेळी सर्वानुमतांचा विचार घेऊन ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात उतरण्याबाबत निश्‍चित पुनर्विचार केला जाईल. मळगाव, आंबोली व चौकुळ ग्रामपंचायतीत काठावर पराभव पत्करावा लागला तर कोलगाव आणि मळेवाड या ठिकाणी शिवसेनेची सत्ता असूनही पराभव पत्करावा लागला. त्याबाबत आत्मपरीक्षण केले जाईल. 

हेही वाचा - विशेष म्हणजे त्यांनी माजी सरपंचांच्या पत्नीलाच धक्का दिला

यापुढे गावपातळीवर प्रचारात

भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडी केली आणि राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरविले; पण शिवसेनेने तसे केले नाही. पुढील काळात सर्वांचा विचार घेऊन निवडणुकीत प्रचारात उतरावे लागेल. तसेच ग्रामपंचायत पातळीवर राजकारण करत नसल्याने ग्रामपंचायतीना विकासनिधी दिला जाईल. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार राहील. तसेच सर्वांच्याच विचाराने शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी प्राधान्य देईन, असे आमदारांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम