दिपक यांच्या हस्तकौशल्यातून बनली पहिली गणेशमुर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Khambal

घरामध्ये दरवर्षी गणेशोत्सवाला प्रतिष्ठापित करण्यात येणारी गणेशमुर्ती आणण्यासाठी कुटुंबियांसमवेत लहानपणापासून कार्यशाळेमध्ये जात होतो. त्यावेळी मुर्ती कशी बनवितात याची नेहमीच उत्सुकता होती.

दिपक यांच्या हस्तकौशल्यातून बनली पहिली गणेशमुर्ती

राजापूर - घरामध्ये दरवर्षी गणेशोत्सवाला प्रतिष्ठापित करण्यात येणारी गणेशमुर्ती आणण्यासाठी कुटुंबियांसमवेत लहानपणापासून कार्यशाळेमध्ये जात होतो. त्यावेळी मुर्ती कशी बनवितात याची नेहमीच उत्सुकता होती. अशी मूर्ती आपणच बनविली तर? असा मनामध्ये आलेल्या विचारांतून प्रेरणा घेत शहरानजीकच्या धोपेश्‍वर खांबलवाडी येथील दिपक खांबल यांनी स्वहस्ते मातीची गणेशमुर्ती तयार करण्याला सुरूवात केली. उपजत कलागुण, कौशल्याला निरिक्षण अन् सातत्याने शिकण्याची वृत्तीला नाविण्याचा ध्यास आणि व्यवसायिकतेची जोड देत गेल्या सोळा वर्षाहून अधिक काळ ते स्वहस्तकौशल्यातून श्री स्वामी कलाकेंद्रामध्ये शाडूच्या गणेशमुर्ती घडवित आहेत.

शहरानजीकच्या धोपेश्‍वर खांबलवाडी येथील दिपक खांबल यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. पुढे चित्रकला जोपासता आली नसली तरी, मोठे झाल्यानंतर त्यांनी व्यवसायिकतेच्या माध्यमातून रंगकामाची आवड जोपासली. गणेशोत्सवामध्ये घरी प्रतिष्ठापीत करण्यात येणारी मूर्ती आणण्यासाठी कार्यशाळेमध्ये कुटुंबियांसमवेत जात असताना घरामध्ये आणण्यात येत असलेली मुर्ती आपणच बनविली तर? असा मनामध्ये एकदिवस विचार आला. त्याच्यातून, त्यांनी पहिल्यांदा गणेशमुर्ती घडविली. त्या आकर्षक मूर्तीचे अनेकांनी कौतुक केले. त्याच्यातून प्रेरणा घेत त्यांनी मुर्तीकलेच्या आवडीला व्यवसायिकेतेची जोड दिली आहे. कोणताही वारसा नसताना केवळ निरिक्षणातून त्यांनी घडविलेल्या मुर्त्या खांबलवाडी, धोपेश्‍वर पन्हळे, विखारेगोठणे, गोवळ आदी गावांमधील गणेशभक्त घेवून जात असल्याचे दिपक सांगतात.

त्यांच्या श्री स्वामी कलाकेंद्र कार्यशाळेची आकर्षक रंगसंगती आणि विविधांगी पोझिशनमधल्या ’गणेशमर्त्या’ ही खासियत आहे. डोळ्यांची रेखणी, साजेसे लक्षवेधी रंगकाम हेही त्यांची वैशिष्ट्य आतहे. गणेशमुर्त्यांची रंगसंगती आणि पोझिशन पाहताना गणेशभक्तांचे मन हरखून जाते. त्यांच्या या कलाकृतीचे गणेशभक्तांसह अनेकांनी अनेकवेळा कौतुक केले आहे. या प्रवासामध्ये हर्डी येथील मुर्तीकार विष्णू पड्यार, कैलास कोठारकर, आई-वडीलांसह चुलते सहदेव खांबल यांचे मार्गदर्शन आणि पत्नी दिक्षा यांचे सहकार्य लाभल्याचे सांगत त्याबद्दल त्यांनी कृतत्रतता व्यक्त केली.

दिपक यांच्या हस्तकौशल्यातून अशी बनली पहिली गणेशमुर्ती

मुर्ती बनविण्यासाठी वारण्यात येणारी शाडूची माती चाळून त्याच्यातील छोटे-मोठे खडे काढून नंतर तिचा मुर्ती बनविण्यासाठी प्रत्यक्ष वापर करायचा असतो याची माहिती नव्हती. त्यामुळे आणलेल्या मातीचा तशाच स्थितीमध्ये वापर करीत मुर्ती बनविण्याला दिपक यांनी सुरूवात केली. मात्र, चार-पाच दिवस सातत्याने प्रयत्न करूनही प्रत्येकवेळी मुर्तीचा आकार पूर्ण होत नव्हता. त्यामध्ये मातीही फुकट जात होती. त्यानंतर, काही जाणकरांकडून माती चाळून त्याच्यातील खडे बाहेर काढावेत आणि नंतर तिचा उपयोग करावा असा सल्ला मिळाला. त्यानंतर, पुन्हा नव्याने माती आणून ती चाळून तिचा वापर केला. त्यानंतर, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून अखेर चार-पाच दिवसानंतर मुर्तीला परिपूर्ण आकार मिळाला आणि खर्‍या अर्थाने गणेश मुर्ती घडल्याचा अत्यानंद झाल्याची माहिती दिपक यांनी दिली.

Web Title: Deepak Khambal Handwork Made The First Ganesh Idol Success

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..