...अन्यथा, या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी द्या

रवींद्र साळवी
Monday, 2 September 2019

लांजा - विधानसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी बाहेरून उमेदवार दिला जातो. शिवसेनेचा आदेश पाळीत त्यांना निवडून दिले जाते; मात्र यावेळी तरी आम्हाला स्थानिक उमेदवार मिळालाच पाहिजे. अन्यथा, या मतदारसंघातून युवा नेते आदित्य ठाकरे यांना उमेदवारी द्या. त्यांना सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आणण्याची जबाबदारी आमची. ठाकरे निवडून आल्यावर या मतदारसंघाचा विकास होईल, असे प्रतिपादन करत जावडे येथील गजानन नामये यांनी स्थानिक उमेदवार या मुद्याला पुन्हा चालना दिली आहे.

याच मतदारसंघात गेली कित्येक वर्षे स्थानिक आमदार नसल्याची उणीव येथील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला स्थानिक आमदारच असावा, असा घोषा काही लोकांनी लावला आहे. कारण सध्या कार्यरत असलेले विद्यमान आमदार राजन साळवी हे स्थानिक नाहीत, अशी भूमिका काही हितसंबंधी व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीत लांजा-राजापूर मतदारसंघातून शिवसेनेला भरभरून मताधिक्‍य मिळाले. परंतु काहीच अवधीत असलेल्या लांजा - राजापूर विधानसभेची निवडणूक शिवसेनेला थोडी कठीण जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

जुलूम शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. जुलूम यांनी डोंबिवली-लांजा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. स्थानिक नेतृत्वाचा प्रश्न सोडविताना शिवसेना त्यांच्या नावाचा विचार करील, असा जगदीश जुलूम यांच्या समर्थकाना विश्‍वास आहे. जुलूम हे कुणबी समाजाचे आहेत. लांजा-राजापुरात ६०% कुणबी मतदार आहेत. त्याचा फायदा जुलूम यांच्या रुपाने शिवसेनेला होणार आहे.

दत्ता कदम यांना दिला होता शब्द
२०१४ ला पक्षनेत्यांनी दत्ता कदम यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले होते. आयत्यावेळी युती तुटल्याने आपला पुढील विधानसभा निवडणुकीत विचार केला जाईल, असा शब्द दिला होता. दत्ता कदम यांना जुन्या शिवसैनिक, युवासैनिक, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची पसंती आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत विविध पदे भूषविली आहेत.

स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा पुढे आल्याने...
सध्याच्या घडीला लांजा राजापूरमध्ये शिवसेनेलाच पोषक वातावरण आहे. मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केले आहे. खरेतर हा तालुका कित्येक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला. परंतु स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा पुढे येत असल्याने येथील स्थानिक जनता नाराजी व्यक्त करू लागली आहे. लांजा - राजापूर मतदारसंघात लांजातून अनेक नावे पुढे येत आहे. यामध्ये दत्ता कदम, जगदिश जुलूम आघाडीवर आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Lanja - Rajapur constituency Shivsainik