

औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मालवण : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत शहरात विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. तसेच महाराष्ट्रात असलेली मुघल बादशाह औरंगजेबाची कबर तातडीने हटवा, अशी मागणी केली.