esakal | 'मंडणगडसाठी अजूनही १९ कोटीं ५० लाखांची गरज'...
sakal

बोलून बातमी शोधा

Deputy Tehsildar Dattatraya said 19 crore 50 lakhs Funding required speaking daily sakal

आपत्काळात प्रशासन नागरिकांसाठी सकारात्मक 

'मंडणगडसाठी अजूनही १९ कोटीं ५० लाखांची गरज'...

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्री वादळात नुकसानग्रस्त झालेल्या मंडणगड तालुक्यासाठी येथील प्रशासन सकारात्मक असून येणाऱ्या समस्या व अडचणींवर मात करून नियोजनबद्द काम करीत आहे. तालुक्याला सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त असून आतापर्यंत तालुक्यात सुमारे २६ कोटी ८० लाखांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले आहे. तर असून १९ कोटी ५० लाखांची आवश्यकता असल्याचे नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


तालुक्यावर आलेल्या निसर्ग चक्री वादळ आपत्तीत तालुका प्रशासनाने आपली कामगिरी सतर्कतेने बजावण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर पोहच व्हावी यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले आहे. तालुक्याला घरे, गुरांचे गोठे, फळबाग अशा विविध नुकसानीसाठी ४५ कोटींचा निधी प्राप्त झाला. त्याप्रमाणे या वादळात दुखापतग्रस्त झालेल्या ७८ नागरिकांना ३ लाख ८६ हजारांची मदत वाटप करण्यात आली आहे. ७०६ मृत जनावरे झाली त्याचे ५ लाख ३४ हजार रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

हेही वाचा- कणकवली शहरांमध्ये एक नियम आणि सावंतवाडी शहरामध्ये वेगळा नियम  असे का ...? -

वादळात ४०२ घरे पूर्णतः नुकसानग्रस्त झाली असून त्यातील ३०९ घरांना ५ कोटी ७१ लाखांची भरपाई निधी वाटप करण्यात आला. तर पक्की, कच्ची १४,९३१ घरांना सुमारे १९ कोटी भरपाई रक्कम देण्यात आली. ९९२ गुरांचे गोठे नुकसानग्रस्त झाले असून ९८९ गोठयांचे २० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अनेक नागरिक, शेतकरी यांच्या बँक खात्यांचे नंबर चुकीचे दिल्याने, अनेक वर्षे खाते बंद असल्याने व बँकेतील कागदपत्रांची पूर्तता नसल्याने खात्यात रक्कम जमा झालेली नाही.

हेही वाचा- प्रकल्प नको तर, जनतेला सेना नको  कोणी दिला इशारा वाचा.... -

त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतून नागरिक तहसिल कार्यालयात येत असून त्यांच्या समस्या समजून अडचणी दूर करण्यासाठी कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. नुकसान ग्रस्तांना भरपाई वेळेत मिळावी यासाठी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

संपादन - अर्चना बनगे 

loading image