esakal | आदि मारलं कोरोनान आता मारलं वादळान ; सांगा आम्ही करायचं तरी काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

destroy storm in ratnagiri harne village kokan marathi news

एकीकडे कोरोनाच संकट तर दुसरीकडे 
नौका या कालच्या वादळात गेली. आता आम्ही काय करायचं ?, काय कमवायच ? आमचं कमवायच साधनच गेलं... 

आदि मारलं कोरोनान आता मारलं वादळान ; सांगा आम्ही करायचं तरी काय ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णे  (रत्नागिरी) : एकीकडे कोरोनाच संकट तर दुसरीकडे 
नौका या कालच्या वादळात गेली. आता आम्ही काय करायचं ?, काय कमवायच ? आमचं कमवायच साधनच गेलं ; अशी व्यथा नुकसानग्रस्त महादेव वाघे यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितली.
  गेले दिड महिना झाला संपूर्ण देशात कोरोनाच संकट उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतभर लॉकडाऊन सुरू आहे. त्याने सर्व उद्योगधंदे बंद आहेत. हर्णे बंदरातील मासेमारी उद्योग देखील बंदच अवस्थेत होता. परंतु गेल्या संपूर्ण हंगामामध्ये मासळी उद्योग प्रचंड नुकसानातंच सुरू होता. त्यामुळे बहुतांशी मच्छीमारांनी फेब्रुवारी मध्येच नौका किनाऱ्यावर घेतल्या होत्या. त्यातच महादेव वाघे यांनी देखील मासळीची आवकच कमी आणि उद्योग परवडत नसल्याने नौका किनाऱ्यावरच काढली होती.

हेही वाचा- भव मांगले सध्या करतात तरी काय.... . वाचा.

असे झाले नुकसान

पुढच्या वर्षी हंगाम चांगला झाला तर नौका मासेमारीकरीता लोटण्याचा विचार होता. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने वाघे यांच्या कमाईच्या साधनावरच घाला घातला. त्यामूळे या अचानक आलेल्या वादळाने माझी MH/F/RTN/02/00704 या क्रमांकाची 'कामधेनू' ही दोन सिलेंडरची नौका संपूर्ण नुकसानात गेली. आमच्या नौकेवर या कालच्या वादळात सुरूच झाड पडल्यामुळे संपूर्ण नौकाच बाद झाली. किमान चार लाखाचे नुकसान झाले आहे. माझी एकच नौका असल्यामुळे माझा एक मोठा आधार संपला.

हेही वाचा- देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, पण रत्नागिरीत काय होतय वाचा

शासनाला केली विनवनी

कमवायच साधनच गेलं. कोरोनाच मोठं संकट डोक्यावर आहेच त्यात हा मोठा धक्का कसा पचवायचा. यापुढे काय कमवायच आणि काय खायचं ? असा यक्ष प्रश्न आमच्या पुढे पडला आहे. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की निदान या अशा लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये तरी लवकरात लवकर या नसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी ; असे नुकसानग्रस्त नौकामालक श्री. महादेव भाया वाघे यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितले.

loading image