
पाली : सुधागड तालुक्यात वाघोशी व वाफेघर गावच्या हद्दीत विकसकाने शेतरस्ते बंद केले आहेत. तसेच येथील नदी पात्रात भराव करून नदीपात्र छोटे केले असून विना परवाना सुरूंग लावले असल्याची तक्रार वाफेघर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. सोमवारी (ता. 19) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पाली-सुधागड तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले.