
सुधागड तालुक्यासह,अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीच्या विकासाला मिळणार गती
पाली : सुधागड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी तब्बल 10 कोटी 55 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये नव्याने प्रस्तापित झालेल्या पाली नगरपंचायतमधील विकासासाठी यातील निम्म्याहून अधिक निधी मिळाला आहे. या भरघोस निधीमुळे सुधागड तालुक्यासह पालीच्या विकासाला गती मिळणार आहे.खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने महाविकास आघाडी शासनातर्फे हा निधी उपलब्ध झाला आहे.
निधीचा विनियोग
जिल्हा नियोजन नागरोत्थान व प्रादेशिक पर्यटन मार्फत 2 कोटी 64 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पाली शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व भुयारी गटारे निर्मिती होणार आहे.
प्रादेशिक पर्यटन मार्फत मिळालेल्या एक कोटी निधीतून तलाव सुशोभीकरण होणार आहे.
नगरपंचायत नागरी सुविधा सहाय्यक योजने अंतर्गत 3 कोटी 20 लाख निधीतून पालीत विविध मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
अल्पसंख्याक विकास निधी मधून मिळालेल्या साडेबारा लाखातून पालीतील कब्रस्तान शुशोभीकरण होणार आहे.
ओडीआर अंतर्गत मिळालेल्या अडीच कोटी निधीतून ग्रामीण भागातील रस्ते होणार आहेत. त्यामध्ये नागशेत, कोशिंबळे, घोटावडे आणि शिळोशी येथील रस्ते निर्मिती होणार आहे.
2515 अंतर्गत 97 लाख मंजूर निधीतून तालुक्यातील विविध रस्ते, समाज मंदिर व साकव होणार आहेत.
जिल्हा नियोजन 3054, 5054 अंतर्गत 68 लाख निधीतून तालुक्यातील पर्यटन विकास, रस्ते, शाळा दुरुस्ती व स्मशानभूमी शेड होणार आहे.
निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आहोत. आलेल्या निधीपैकी बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या तीन ते 4 दिवसांत पालीतील रस्त्यांची कामे सुरू होतील. लवकरच शुद्ध पाणी योजना देखील मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालीच्या विकासाला गती देण्यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे.
गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली
Web Title: Development Ashtavinayak Pilgrimage Site Pali Along Sudhagad Taluka Get Momentum Fund Sanctioned
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..