रोजगाराच्या आमिषाने कुणाला फसवले नाही ः केसरकर

development works Statement MLA Deepak Kesarkar
development works Statement MLA Deepak Kesarkar

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - काही लोकांकडून राजकीय पक्षांना गाड्या दिल्या; मात्र गाई-म्हैशी दिल्या असत्या तर सर्वसामान्य शेतकरी मजबूत झाला असता. नाहक रोजगार आणि विकासाचे आमिष दाखवून कोणाला फसवले नाही, असे सुचक वक्‍तव्य आज माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी माडखोल येथे केले. 

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या दुग्ध विकास प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटन प्रसंगी केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, सह्ययक निबंधक कृष्णाकांत धुळप, उद्योजक प्रशांत कामत, अजय भुटे, एम. के. गावडे, सुनंदा राऊळ, संजय शिरसाठ, एम. के. गावडे, डॉ. प्रसाद देवधर, प्रभाकर देसाई, प्रज्ञा परब, श्री. ओटवणेकर, रेश्‍मा सावंत, दत्ताराम कोळमेकर, डॉ. राजेश नवांगुळ, अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते. 

आमदार केसरकर पुढे म्हणाले, ""काही लोकांकडून राजकीय पक्षांना गाड्या दिल्या; मात्र गाई-म्हशी दिल्या असत्या तर सर्वसामान्य शेतकरी मजबूत झाला असता. नाहक रोजगार आणि विकासाचे आमीष दाखवून आम्ही कोणाला फसवले नाही. शेती आणि शेती उत्पन्नासाठी अनुदान व कर्ज देऊन शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक शेतकरी घडतील.'' 

श्री. सावंत म्हणाले, ""येथील शेतकऱ्याला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे नाहक टीका करून किंवा आश्‍वासने देऊन चालणार नाही. आम्ही प्रत्यक्षात काम करून त्यांना रोजगाराची दालने उभी करून दिली आहेत. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून रोजगार आणि उद्योगधंदा तयार करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे समाधान केले जाते त्याची अडचण समजून घेऊन त्याला कर्जपुरवठा केला जातो. याठिकाणी शेतकरी सुखी व समाधानी झाला पाहिजे. शहराकडे वळणाऱ्या लोकांना गावातच रोजगाराची साधने निर्माण झाली पाहिजे.

यासाठी जिल्हा बॅंकेचे प्रयत्न आहेत. त्या ठिकाणी सुरु केलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गाई-गुरांचा व व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्‍यक ती प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुरांची काळजी कशी घ्यावी? त्याचबरोबर दुधाचे उत्पन्न कसे वाढवावे? याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा येथील नव्या उद्योजकांनी घ्यावा.'' 
दुग्ध उत्पादन व्यवसायाबाबत शासन उदासीन आहे. शासनाने चारा गाई-म्हशी व व्याजात सवलत अशा योजना आणल्या पाहिजेत.

याठिकाणी जिल्हा बॅंकेने नवउद्योजकांना उद्योगधंद्यांमध्ये ऊर्जितावस्था आणण्यासाठी मदत केली. यापुढेही बॅंक शेतकऱ्यांच्या मागे राहील, अशी आशा आहे. त्यामुळे दूध व्यवसायात उतरताना व्यावसायिक म्हणूनच पावले उचला, असे आवाहन श्री. गावडे यांनी केले. येथील दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्याला एक दुग्ध क्रांती करण्यासाठी नवचैतन्य देईल, असे मत श्री. देवधर यांनी व्यक्त केले. 

...तर "चांदा ते बांदा' राज्यात 
येथील शेतकऱ्यांनी कोकण आणि विदर्भ असा फरक करु नये. शिवराम भाऊंना अपेक्षित काम जिल्हा बॅंक अध्यक्ष सावंत करत आहेत, याचा अभिमान आहे. "चांदा ते बांदा' काही काळासाठी बंद केली होती. पवार साहेबांनी ठरवलं तर "रत्नसिंधु' किंवा "चांदा ते बांदा' म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात राबविली जाईल, असे मत माजी पालकमंत्री आमदार केसरकर यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांसाठी प्रयत्न 
केसरकर म्हणाले, की ""सावंत यांच्या काळात जिल्हा बॅंकेची चांगली भरभराट झाली. भविष्यात आमदार झालात तरी आणखी 20 वर्षे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहा. शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी "चांदा ते बांदा' योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही विरोधात असल्यामुळे थेट योजना देण्यास भीती होती; परंतु तुम्ही आमच्याकडे आला. त्यामुळे नक्कीच विकास होईल.'' 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com