दोन महिन्याचं बाळ झालं पोरकं, दुधासाठी भूमीची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child photo

दोन महिन्याचं बाळ झालं पोरकं, दुधासाठी भूमीची हाक

मुंबई - कोरोनाच्या काळात अवती भोवती जे काही होत आहे ते हादरवून सोडणारे आहे. हद्य पिळवटून टाकणारे आहे. अनेकांनी आपल्या लाडक्यांना गमावले आहे. कुणाच्या डोक्यावरुन पितृछत्र हरवले आहे तर कुणाला आईपासून वेगळे केले आहे. अशा परिस्थितीत काय करावं असा प्रश्न त्या पीडितांकडे आहे. अशीच एक हद्यद्रावक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात कोरोनामुळे दोन महिन्याच्या बाळानं आपल्या आईला गमावले आहे. त्याला जेव्हा दुधाची गरज भासली तेव्हा त्याच्या मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले आहे.

अभिनेत्री भूमि पेडणेकरनं सोशल मीडियावर अनेकांकडे मदतीचे आवाहन केले आहे. कोरोनाची दूसरी लाट अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. त्याच्या भयानक परिणामांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनामुळे सर्व लोकांपुढे दररोज वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. अद्याप कोरोनावर रामबाण इलाज नसला तरी आता या आजारानं आपला रोख लहान मुलांकडे वळविल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचे गंभीर परिणाम सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे.

सध्या कोरोनाकाळात शासनाच्या मदतीसाठी बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनीही पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे सगळ्यांना वेगळ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाला आहे. कोरोनामुळे अनेक मुलांना अनाथ व्हावे लागले आहे. अशा पोरक्या झालेल्या मुलांसाठी बॉलीवूडमधील सेलिब्रेटी पुढे सरसावले आहेत. आता बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री भूमी पेडणेकरनं दोन महिन्याच्या मुलाला दुध मिळावे यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले आहे.

हेही वाचा: 'द फॅमिली मॅन २'मध्ये आसिफ यांना पाहून चाहते भावूक; सहा महिन्यांपूर्वी केली होती आत्महत्या

हेही वाचा: नुसरतनं मेडिकल स्टोअरवर जे विकलं त्याची झाली चर्चा...

त्या लहान मुलाच्या आईचे कोरोनानं निधन झाले. त्यामुळे तिच्या अनाथ मुलाला काम मिळावे असे आवाहन भूमीनं केले आहे. भूमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. भूमीनं व्टिट करताना लिहिलं आहे की, दोन महिन्याचे बाळ आहे. त्याची आई गेली आहे. बाकुरा म्हणजे पश्चिम बंगाल मधील त्या गावामध्ये त्या दोन महिन्याच्या बाळाला दुधाची गरज आहे. सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल झाली आहे.

Web Title: Bhumi Pednekar Posts A Plea Seeking Breast Milk Donor For A 2 Month Old Baby Mother Passed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top