काळ वेळ बघून उत्तर देऊ; नितेश राणेंच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस; नीतेश राणेंनी घेतली भेट
Devendra Fadnavis Meet Nitesh Rane
Devendra Fadnavis Meet Nitesh Rane
Updated on

सावंतवाडी : आमदार नीतेश राणे यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने केलेल्या कारवाईबाबत काळ आणि वेळ बघून उत्तर देणार असल्याचा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री तथा गोवा राज्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर गोवा येथे आमदार नीतेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. त्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. (Devendra Fadnavis Meet Nitesh Rane)

संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने जामीन दिल्यानंतर राणे यांनी थेट गोवा गाठले. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थिती लावली. सभा संपल्यानंतर आमदार राणे यांनी फडणवीस यांची म्हापसा येथे भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी राणे यांची आपुलकीने विचारपूस करत जिल्हा बँकेतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बंद दरवाजाआड दोघांचीही बैठक पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, राकेश परब आदी होते.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘राणे यांच्यावरील कारवाईबाबत आपण आत्ताच बोलणार नाही. वेळ आणि काळ बघून उत्तर देण्यात येईल." आमदार राणे म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी आपल्याला जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांची आपण भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. काळ आणि वेळ बघून भूमिका घेऊ, असा शब्द त्यांनी दिला. सध्या तरी माझ्यासाठी पक्ष प्रथम असून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पुढचे काही दिवस आपण पक्षासाठी काम करणार आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याशी संबंधित लोकांच्या गाठीभेटी घेणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mandangad Shenale Ghat landslide latest update
Two tourists drowned at Devkund Waterfall in Raigad after allegedly entering the prohibited area despite the monsoon tourism ban.
Raigad
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Sangameshwar
Marathi News Esakal
www.esakal.com