esakal | फडणवीस-सामंत भेटीत वावगं काय? वैभव नाईक
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस-सामंत भेटीत वावगं काय? वैभव नाईक

फडणवीस-सामंत भेटीत वावगं काय? वैभव नाईक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : संकट काळात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास संकटावर मात करणे सोपे जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील हेच म्हणणे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि उदय सामंत (Uday Samant)यांच्यात भेट झाली तर त्यात वावगं काय? असा सवाल आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी उपस्थित केला.आमदार नाईक म्हणाले, “उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग पालकमंत्री आणि रत्नागिरी स्थानिक आमदार म्हणून जबाबदारी आहे. (Devendra-Fadnavis-Uday-Samant-meeting-speech-in-mla-vaibhav-naik-kokan-news)

गेली 20 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून ते काम पाहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, विरोधी पक्षनेते फडणवीस कोकण दौर्‍यावर आले. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांचे काही म्हणणे असेल विरोधी आमदार यांच्या काही सूचना असतील तर त्यासंदर्भात चर्चा करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी सामंत यांचे प्रयत्न सुरु आहेत. संकट काळात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास संकटावर मात करणे सोपे जाते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे देखील हेच म्हणणे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते फडणवीस आणि सामंत यांच्यात भेट झाली तर त्यात वावगं काय?”

नाईक पुढे म्हणाले, “सध्या निवडणुकीचा कालावधी नाही. त्यामुळे वादळाच्या पार्श्‍वभूमीवर झालेले नेत्यांचे दौरे हे राजकीय दौरे नसून लोकहितासाठीच आहेत. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत फडणवीस आणि सामंत यांच्यात भेट झाली. नारायण राणे मंत्री होते, तेव्हा विरोधी पक्षाला दुय्यम स्थान द्यायचे.

हेही वाचा- सावधान! जादा दराने खत विकल्यास होणार कारवाई

विरोधी पक्षांनी सुचविलेली कामे डावलून टाकायचे. सामंत विरोधी पक्षाचे म्हणणे ते जाणून घेतात. सामंत यांच्यासोबत काम करताना गेल्या वर्षभरात अनेक विरोधी सदस्य त्यांच्या संपर्कात असतात; मात्र राणे कुटुंबियांना हे कळले कि त्यांची जळफळाट सुरु होते; मात्र फडणवीस यांच्याबाबत हे करणे शक्य नसल्याने निलेश राणेंनी ट्विटरवर आपला जळफळाट व्यक्त केला. निवडणुकीपुरते राजकारण, त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या या महामारीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. हे संवाद घडून आले पाहिजेत म्हणूनच सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यात काही गैर नाही. त्यांनी असाच पुढाकार घ्यावा. आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी कायम राहीन. ठाकरे यांच्या मनात याबाबत कोणतीही शंका नाही. सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे असून या संकटातून कोकणवासियांना बाहेर काढायचे आहे.”