Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Rising Fuel and Maintenance Costs Add to Fishing Expenses : इंधन, बर्फ, देखभाल, जाळी आणि अन्य खर्च वाढत असताना अपेक्षित मासळी न मिळाल्याने उत्पन्न-खर्चाचे गणित बिघडत आहे.
Devgad Fishermen Crisis

Devgad Fishermen Crisis

esakal

Updated on

देवगड : हापूस आंब्याबरोबरच मासळी हंगामाच्या उलाढालीवरही स्थानिक बाजाराची अर्थव्यवस्था अवलंबून असते. मासळी हंगामालाही नैसर्गिक बदलाबरोबरच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या व्यवसायातही अनिश्‍चितता असते. मच्छीमारीला गेल्यावर अपेक्षित मासळी मिळाली नसल्यास इंधनासह अन्य खर्च वाया जातो. पर्यायाने आर्थिक नुकसानीची तीव्रता वाढते. या व्यवसायावरही पूरक व्यवसायाची साखळी असून सर्वांनाच त्याची झळ बसते. बाजाराची आर्थिक गणितेही यावर अवलंबून असल्याने एकूणच अर्थव्यवस्था विस्कळीत होत असल्याचे दिसून येते.

तालुक्याच्या समुद्रकिनारी भागात मासेमारी व्यवसाय चालतो. खाडीतील मासेमारीपासून अगदी खोल समुद्रातील मासेमारीपर्यंत मच्छीमारी व्यवसाय विस्तारला आहे. इंधन, देखभाल दुरुस्ती, बर्फ, पिण्याचे पाणी, जाळी, मच्छीमारांवरील खर्च ही खर्चाची साखळी आहे. नौका समुद्रात गेल्यावर पुरेशी मासळी मिळाल्यास खर्च वजा जाता हाती काही शिल्लक राहू शकते.

Devgad Fishermen Crisis
Harnai Nirmalya Collection : हर्णै परिसरात प्रथमच निर्माल्य संकलन; ८० टक्के निर्माल्य समुद्रात जाण्यापासून वाचवले

खाडीकिनारी मासळी लिलावाच्या ठिकाणी मासळीला अपेक्षित दर मिळाल्यास मच्छीमारांच्यादृष्टीने समाधानाची बाब ठरू शकते. येथेही वाहतूकदार, विक्रेते यांनाही व्यवसायातील चढ-उताराचा सामना करण्याची वेळ येते. हा व्यवसाय तेजीत गेल्यास मच्छीमारांसह अन्य व्यवसायिकांच्या हाती समाधानकारक रक्कम असल्यास बाजारात हौशेने काही खरेदीवर भर असतो. मात्र, अलीकडील काही वर्षे या व्यवसायातही अनेक संकटांशी दोन हात करण्याची वेळ येते. जूनपासून जुलै अखेरपर्यंत मासेमारी बंदी कालावधी असतो.

यंदा त्यामध्ये १५ ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. असे असले तरी काही मच्छीमार गणेशोत्सवानंतर हंगामाचा प्रारंभ करतात. त्यात पुन्हा सण-उत्सव आल्यास, नौकांच्या डागडुजीसाठी तसेच नैसर्गिक आपत्ती आल्यास मासेमारी बंद असते. अशावेळी काही मोजके महिनेच मासेमारी हंगाम चालतो. त्यातच विविध संकटे आल्यास मच्छीमारांना आर्थिक समस्यांचा सामना करण्याची वेळ येते. मासेमारीचा पूर्णतः व्यवसाय नैसर्गिक घडामोडींवर अवलंबून असतो. केवळ पावसाळी कालावधीतच धोका असतो असेही नाही, तर समुद्री वादळे कधीही येतात आणि समुद्रातील वातावरण केव्हाही बदलू शकते.

अशावेळी मच्छीमारी व्यवसाय बंद ठेवण्यावाचून पर्याय राहत नाही. समुद्राशी निगडित व्यवसाय असल्याने प्रत्येक दिवस मच्छीमारांना नवा अनुभव घेऊन येतो. काहीवेळा वातावरण चांगले असले तरी समुद्रातील अंतर्गत हालचालीमुळे मासे मिळणे कठीण बनते. अशावेळी मासेमारीवर खर्च करूनही अपेक्षित मासळी मिळाली नाही तर आपोआपच मिळकत कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती वाढत जाते.

काहीवेळा मुबलक मासळी मिळते; पण दर नाही, अशीही अवस्था निर्माण होते. याचाही फटका मच्छीमारांना सहन करावा लागतो. मच्छीमारीला गेल्यावर किंमती मासळी मिळेल का? असाही प्रश्‍न असतो. त्यामुळे चांगला मासळी हंगाम गेल्यास मच्छीमारांसाठी सुखावह ठरते. मासळीची एकूणच उलाढाल पूरक व्यवसायासह स्थानिक बाजारपेठेवर अनेक परिणाम घडवू शकते. मच्छीमारी साधनांचेही वाढते दर असल्याने दिवसेंदिवस व्यवसाय करणेही कठीण बनू शकते. आंबा आणि मासळी हे दोन्ही व्यवसाय तालुक्याची ओळख असल्याने त्याची स्थिती समाधानकारक असल्यास आपोआपच बाजारातील उलाढाल उंचावण्यास मदत होते. शाश्वत उत्पन्नावर अनेक गोष्टींचे आगावू ठरवल्या जाऊ शकतात. मात्र, निसर्गाशी निगडित असलेले मासळी आणि आंबा हंगाम स्थानिक बाजारावर परिणामकारक ठरू शकतात.

Devgad Fishermen Crisis
Harnai Nirmalya Collection : हर्णै परिसरात प्रथमच निर्माल्य संकलन; ८० टक्के निर्माल्य समुद्रात जाण्यापासून वाचवले

सुरक्षित बंदराचा आधार

तालुक्यातील विजयदुर्ग आणि देवगड ही दोन सुरक्षित नैसर्गिक बंदरे मच्छीमारांची बलस्थाने आहेत. अनेक नैसर्गिक आपत्तीवेळी कोकण किनारी भागासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील मच्छीमारी नौका बंदरात आश्रय घेतात. हवामान पूर्ववत होईपर्यंत नौका बंदरात थांबून असतात. अलीकडील काही वर्षांत समुद्री वादळात वाढ झाल्याने समुद्रातील खराब हवामानावेळी मच्छीमारी नौका सुरक्षितता म्हणून बंदरात आश्रयाला येतात. अशा नैसर्गिक आपत्तीवेळी मच्छीमारी हंगाम थंडावतो. मात्र, नौकेवरील मच्छीमारांचा खर्च सुरूच असल्याने ‘मासळी नाही, पण खर्च सुरू’ अशी स्थिती असते. यामुळे मच्छीमारांना या समस्यांचा सामना करण्याची वेळ येते.

इंधन वाढीची समस्या

अलीकडे मच्छीमारांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. यासाठी जादा रक्कम मोजावी लागते. त्यामुळे मिळणारी मासळी आणि होणारा खर्च पाहता काहीवेळा मच्छीमारांची आर्थिक ओढाताण देखील होते. मासळीचे प्रमाण घटल्यास आपोआपच त्यावरील पूरक व्यवसायही अडचणीत येतात. पर्यायाने बाजाराची साखळी मंदावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com