
कोरोनाचे नियम पाळून उत्सव ; विविध कार्यक्रम साधेपणाने
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील गणेश मंदिरात मागी चतुर्थी निमित्त कोरोनाचे सर्व नियम पाळून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. माघी गणेशोत्सवानिमित्त गणेशगुळे येथील गणेश मंदिरात उत्सवाला 13 फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे.
शासनाच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
तीन दिवस चालणार्या या कार्यक्रमातून विविध कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. दहा महिने मंदिरात कोरोनाचे सावट असल्यामुळे बंद होते. मागील वर्षी उत्सव झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आता निर्बंध उठल्यानंतर हे मंदिरही दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यावर्षीचा माघी चतुर्थीचा उत्सव शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून प्रत्येक भक्ताला सॅनिटायझर लावून तपासणी करूनच आत सोडले जात आहे.
हेही वाचा- Success Story : पन्नास शेळ्यांच्या मदतीने खडकाळ जमिनीवर फुलवले बुश काळीमिरीचे लेंगर
नवसाला पावणारा गणपती असल्याने भाविकांची पावले आपोआप या मंदिराकडे वळत आहेत. वर्षभरातील एकमेव मोठा वार्षिक उत्सव असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. तीन दिवसांमध्ये दररोज रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी नाटके सादर करण्यात आले. उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्याने स्थानिक लोकांनी दुकाने लावल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. गावाचा वार्षिक उत्सव असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमात सहभागी होऊन शांततेत कार्यक्रम साजरे केले. स्थानिकांबरोबर परजिल्ह्यातील अनेकांनी उत्सवबरोबर समुद्रकिनार्याचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावली होती.
संपादन- अर्चना बनगे