ना दार, ना भिंती... कोकणातील 'या' मंदिराची हीच आहे ख्याती...

प्रमोद हर्डीकर
Sunday, 26 July 2020

भाविकांना सोमवारी दर्शन होणार...

साडवली - कोराना काळात पहिल्याच श्रावण सोमवारी शंकराच्या देवळात जावून दर्शन घेता येणार नसले तरी देवरुख शाळा नं.१ जवळील दुबळेश्वर मंदिर याला अपवाद ठरणार आहे.कारण या पुरातन दुबळेश्वर मंदिराला दारे नाहीत,भिंती नाहीत असे चोहोबाजुने दर्शनासाठी खुले असणारे हे एकमेव मंदिर आहे.श्रावण सोमवारी निस्सिम भक्तांना दुबळेश्वरच समाधानाची अनुभुती देणार आहे.

मारळचे प्रसिद्ध तीर्थक्षेञ श्री मार्लेश्वर,संगमेश्वर कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिर,पाटगावचे श्री सांब मंदिर,बुरंबाडचे श्री आमनायेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थाननी घेतला आहे.

देवरुख परिसरातील शिवमंदिरेही बंद आहेत.यामुळे दुबळेश्वर मंदिराची महती अधिक वाढली आहे.या दुबळेश्वर मंदिराबाबत देखभाल करणारे बाळशेठ रेडीज यांनी याबाबत माहीती देताना या ठिकाणी पुर्वी मोठा कातळ होता.परिसरातील कुलकर्णी,मोघे,मुगरे,जोशी यांनी पाण्याची सोय होईल या हेतुने हा कातळ फोडुन विहीर खोदण्याचा निर्णय घेतला व कामही सुरु केले होते.कातळाचा बरासचा भाग खोदुन झाल्यावर नंदी व शिवलिंग या मंडळींना आढळुन आले आणि विहिर खोदण्याचा निर्णय रद्द केला व हे शिवलिंग दुबळेश्वर नावाने प्रसिद्ध झाले.
या दुबळेश्वर मंदिराला भिंती,दारे बांधली गेली नाहीत.

मोठी बातमी : कोरोना लसीची मानवी चाचणी होणार 'या' जिल्ह्यात....

बाबा सावंत यांनी या मंदिरासाठी चौथरा बांधुन दिला. आजतागायत हे मंदिर बारा महिने खुल्या आकाशाच्या छताखाली आहे.पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांना दर्शन देणारे मंदिर ठरणार आहे.या ठिकाणी रेडीज,जंगम,गेल्ये कुंटुब या मंदिराची देखभाल करत आहेत.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Devrukh ancient Dubleshwar temple has no doors no walls

Tags
टॉपिकस
Topic Tags: