गर्दी टाळण्यासाठी देवरुखने लढवली अशी युक्ती...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

आरोग्याच्या काळजीसाठी नागरीकांनी हा फंडा स्विकारला व गर्दी न करता भाजी विक्री सुरळीत सुरु झाल्याचे पहायला मिळाले.

साडवली (रत्नागिरी) : लाॅकडाउनच्या काळात देवरुख शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी व्यवहार ठप्प होते.नागरीक माञ भाजीपाला व कीराणा घेण्यासाठी बाजारात गर्दी करताना दिसत होते.

हेही वाचा- बापरे : गर्दी कशी महा गर्दी सांगलीत नियम धाब्यावर...

नागरीकांनी स्विकारला हा फंडा

पाच पेक्षा जास्त नागरीक एकञ येवु नयेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाजी व्यापारी बाळासाहेब ढवळे यांनी भाजी दुकानासमोर पाच चौकोन आखले व नागरीकांनी रांगेत या चौकोनात येवुन भाजी खरेदी करावी असे आवाहन केले.

 हेही वाचा- महत्वाचे...महापालिका क्षेत्रात येथे  मिळणार भाजीपाला -

आरोग्याच्या काळजीसाठी नागरीकांनी हा फंडा स्विकारला व गर्दी न करता भाजी विक्री सुरळीत सुरु झाल्याचे पहायला मिळाले.असेच प्रयोग सर्व ठिकाणी झाल्यास सुसुञता नक्कीच येईल असेही मत व्यक्त करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devrukh implemented the idea to avoid crowds for vegetables kokan marathi news