महत्वाचे...महापालिका क्षेत्रात येथे  मिळणार भाजीपाला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सांगली-"कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीत शिवाजी मंडई आणि जुनी भाजी मंडई येथे ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 18 ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे निश्‍चित केली आहेत. तेथे सकाळी 7 ते 11 पर्यंत भाजीपाला उपलब्ध होईल. 

सांगली-"कोरोना' चा प्रसार रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीत शिवाजी मंडई आणि जुनी भाजी मंडई येथे ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 18 ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे निश्‍चित केली आहेत. तेथे सकाळी 7 ते 11 पर्यंत भाजीपाला उपलब्ध होईल. 

"कोरोना' चा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनानुसार भाजीपाला विक्रेते संघटनेने सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील आठवडा बाजार बंद केले आहेत. परंतू भाजीपाला हा नाशवंत आणि जीवनावश्‍यक माल असल्यामुळे त्याच्या विक्रीसाठी शिवाजी मंडई आणि जुनी भाजी मंडई ही दोन ठिकाणे निश्‍चित केली होती. परंतू काल आणि आज तेथे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मिरजेत देखील हीच परिस्थिती होती. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आज पोलिसांना लाठीमार करावा लागला.

 
भाजीपाला विक्रीची अडचण लक्षात घेऊन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज भाजीपाला विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन्ही शहरातील 18 ठिकाणे निश्‍चित केली. या 18 ठिकाणी बुधवार (ता.25) पासून सकाळी 7 ते 11 पर्यंत भाजी विक्री केली जाणार आहे. नागरिकांनी भाजीपाल्यासाठी गर्दी न करता एका विक्रेत्याजवळ पाचपेक्षा अधिकजणांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच भाजी खरेदी करताना दोन व्यक्तींमध्ये पाच फुटापेक्षा अधिक अंतर राहील याची काळजी घ्यावी. भाजी विक्री ठिकाणापासून गाड्यांचे पार्किंग शंभर फुट अंतरावर करावे. सदरची भाजीपाला विक्री केंद्रे नियमित सुरू राहणार असल्यामुळे ग्राहकांनी नाहक गर्दी करू नये असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. 

येथे मिळेल भाजीपाला- 

सांगली विभाग- पेठभाग भाजी मंडई, शिवाजी मंडई, सांगलीवाडी चिंचबाग, एसटी ऑफीससमोर कोल्हापूर रस्ता, महावीर उद्यान (बापट मळा), माधवनगर जकात नाका, बायपास रस्ता पेट्रोलपंप, एसएफसी मॉल पार्किंग परिसर, स्फूर्ती चौक विश्रामबाग, खिलारे मंगल कार्यालयासमोर शामरावनगर. 

मिरज विभाग- लक्ष्मी मार्केट, गाडवे चौक, शास्त्री चौक/फुले चौक, न्यू इंग्लिश स्कुलसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान 

कुपवाड विभाग- कापसे प्लॉट, मंगळवार बाजार कॉर्नर, अभयनगर स्टेट बॅंक कॉलनी, बर्वे शाळेजवळ, रोहिदासनगर पाण्याच्या टाकीजवळील क्रीडांगण. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important ... Vegetables will be found here in the municipal area