esakal | पोहण्याचा थरार बेतला जीवावर; धामापूर घारेवाडी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

man died by drowning in river in ballarpur of chandrapur

पोहण्याचा थरार बेतला जीवावर; धामापूर घारेवाडी दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
- संदेश सप्रे

संगमेश्वर (रत्नागिरी) : तालुक्यात मागील आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्या-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी उतरलेल्या सहापैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार धामापूर घारेवाडी (Dhamapur, Gharewadi)येथे घडला.संगमेश्वर (sangmeshwar)पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथे रविवारी दुपारी सोडतीन वाजण्याच्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (32) , चेतन सूर्यकांत सागवेकर (18) (रा . धामापूर, घारेवाडी) हे दोघेही धामपूर येथील नदीत गायमुख परिसरात मुंबईकर मित्रांसोबत पोहण्यासाठी आलेले होते. (dhamapur-gharewadi-two-young-man-drown-died-sangmeshwar-ratnagiri-konkan-rain-update-news-abk84)

पुराच्या पाण्यात पोहण्याचा थरार त्यांच्या जीवावर बेतला. प्रचंड वेगाने वाहणार्‍या पाण्यात त्या सहाही जणांनी झोकुन दिले. किनारी भागातही पाण्याला ओढ होती. किनार्‍यावरुन ते हळूहळू प्रवाहात ओढले गेले. पावसामुळे नदी दुथडी भरुन वाहत होती. पाण्याच्या लोंढ्याबरोबर ते दोघेही वाहून जाऊ लागले. यामध्ये त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. याला पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: महाबळेश्वरात कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील डॉक्टर जखमी

या मुलांसोबत असणार्‍या औदुंबर प्रकाश पवार (27), शुभम शांताराम चव्हाण (20), राज तुकाराम चव्हाण (18), साईल संतोष कांगणे (17) या चौघांनी बुडणार्‍या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही. संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक झावरे सहकारी शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल झापडेकर, मोंडे, मानके, गायकवाड यांच्यासह तातडीने घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा करुन तपासकार्य सुरु केले. या दुर्दैवी घटनेमुळे धामापूर घारेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

loading image