esakal | महाबळेश्वरात कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील डॉक्टर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

महाबळेश्वरात कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील डॉक्टर जखमी

महाबळेश्वरात कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील डॉक्टर जखमी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील वेण्णालेक रोडवरील प्रतापसिंह उद्यानाजवळ सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कार कोसळून पुणे येथील भुलतज्ज्ञ डॉ. रिमा मनोहर बोधे (वय ३२) या डोक्याला मार लागून जखमी झाल्या आहेत. स्थानिक युवकांनी कारमधील दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

येथून मध्यरात्री एक वाजता नोबिन खान व मुस्तकिन बागवान हे दोघे वाईकडे निघाले होते. प्रतापसिंह उद्यानाजवळ येताच त्यांना महीलेचा ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज आल्याने ते थांबले. त्या वेळी कार खड्ड्यात कोसळली होती. त्या कारमधील महिला जखमी झाली होती. स्थानिक युवकांनी कारमधील जखमींना बाहेर काढून ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.

हेही वाचा: सांगली बंद उठवण्याबाबत खलबते, रात्री उशीरा निर्णय अपेक्षित

सांगली बंद उठवण्याबाबत खलबते; रात्री उशीरा निर्णय अपेक्षित

डॉ. रिमा ह्या मित्राबरोबर महाबळेश्वरला सहलीसाठी आले होते. साडेबाराच्या सुमारास त्यांची कार प्रतापसिंह उद्यानाजवळ आली. त्यावेळी हलका पाऊस पडत होता. रस्त्यावर प्रचंड धुके पसरले होते. रस्त्यावर स्ट्रीट लाईट देखील बंद होत्या. त्यामुळे वाहनचालकाचा अंदाज चुकल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावरून खोल खड्ड्यात कोसळली.

loading image