...ते पिस्तुल हातखंबा पुलाखाली जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

शहरातील प्रसिद्ध मोबाईल व्यवसायिक मनोहर ढेकणे असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. 21 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नॅशनल मोबाईल शॉपी बंद करून ढेकणे घरी गेले. तेथे चारचाकी गाडीतून सचिन जुमनाणकर व त्याचे सहकारी आले.

रत्नागिरी - पन्नास हजाराच्या खंडणीसाठी मोबाईल दुकान मालकांवर गोळी झाडलेले ते पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. गोळी झाडुन खुनी हल्ला केल्यानंतर नामचीन गुंड सचिन जुमनाळकर याने कर्नाटकात पळून जाण्यापूर्वी हातखंबा येथील पोलिस वाहतूक मदतकेंद्राआधी असलेल्या पुलाखाली रिव्हॉल्व्हर लपवून ठेवले होते. ते तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केले आहे. 

शहरातील प्रसिद्ध मोबाईल व्यवसायिक मनोहर ढेकणे असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. 21 फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नॅशनल मोबाईल शॉपी बंद करून ढेकणे घरी गेले. तेथे चारचाकी गाडीतून सचिन जुमनाणकर व त्याचे सहकारी आले. त्यांनी ढेकणे यांच्याकडे 50 हजाराची खंडणी मागितली. एवढे पैसे देणे मला शक्‍य नाही, असे सांगत ढेकणे यांनी खंडणी देण्यास नकार दिला.

यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाजी झाली. अखेर राग अनावर झालेल्या सचिन जुमनाणकर ढेकणे यांच्या पोटात गोळी झाडली आणि त्याच चारचाकी कारमधून फरार झाला. पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून 24 फेब्रुवारीला कर्नाटकात सचिन जुमनाणकर याला ताब्यात घेतले होते. त्याच वेळी सचिनच्या केलेल्या प्राथमिक चौकशीत गुन्हा घडला त्यावेळी त्याच्या सोबत पुतण्या मनोहर चलवादी, मेहुणा सिद्धाराम कांबळे हे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

कर्नाटकला पळुन जाण्यापूर्वी.. 

पोलिसांनी सचिनला अटक केल्यानंतरही त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल कोठे आहे, हे सांगत नव्हता. अखेर पोलिसांनी आपला खाक्‍या दाखवल्यावर ते कुठे ठेवले आहे, ते दाखविले. ढेकणे यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन जुमनाळकर कर्नाटकला पळुन जाण्यापूर्वी त्याने हातखंबा येथे पुलाखाली गावठी पिस्तुल लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून हे पिस्तुल जप्त केले आहे. मात्र, हे नेमके कोठून व कोणाकडून आणले हे अद्याप उघड झालेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhekane Firing Follow Up Pistol Found Under Bridge