सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून 'यांचा' अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

महाराष्ट्र काँग्रेसच्या मुंबई गांधी भवन येथे झालेल्या बैठकीत प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात व इतर नेते मंडळीनी काँग्रेस पक्षाकडून ॲड. नार्वेकर यांच्या नावाला पसंती दिली होती.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - आमदार दीपक केसरकर यांनी येथील नगराध्यक्ष पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढा देण्याचे निश्‍चित केले असताना आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ॲड. दिलीप नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसने रॅली काढत वेगळे शक्तीप्रदर्शन केले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या मुंबई गांधी भवन येथे झालेल्या बैठकीत प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात व इतर नेते मंडळीनी काँग्रेस पक्षाकडून ॲड. नार्वेकर यांच्या नावाला पसंती दिली होती. या पार्श्‍वभूमीवर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक येथील मातृछाया मंगल कार्यालयात झाली. यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, ॲड. दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, साक्षी वंजारी, रमेश पई, काशिनाथ दुभाषी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शक्तिप्रदर्शन करत रॅलीद्वारे येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत खांडेकर यांच्याकडे नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बाळा गावडे, निता गावडे, महेंद्र सांगेलकर, रफिक शेख, राघवेंद्र नार्वेकर, तौकीर शेख, विभावरी सुकी, रवींद्र म्हापसेकर, अदीती मेस्त्री, अरुण भिसे, बाळा नमशी, हर्षवर्धन धारणकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा निर्णय बंधनकारक

महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी निश्‍चितीबाबत जो निर्णय दिला जाईल तो पाळणे बंधनकारक आहे. अद्याप महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्यानंतर पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम केले जाईल, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Narvekar Fill Form For Sawantwadi City President Election