esakal | मंडणगडच्या कलाकारांनी बिंबवले कोरोनाचे ' गांभीर्य ' :
sakal

बोलून बातमी शोधा

Directed by Aniket Nachnekar gambhira short film aim of creating covid 19 awareness among the citizens

मंडणगडच्या स्थानिक कलाकारांची कलाकृती; ग्रामीण भागात जनजागृती होण्यास मदत

मंडणगडच्या कलाकारांनी बिंबवले कोरोनाचे ' गांभीर्य ' :

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहरातून गावात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बनविण्यात आलेल्या ' गांभीर्य ' या शॉर्ट फिल्मने कोरोनाचे गांभीर्य बिंबवण्याचे काम केले आहे. मंडणगड तालुक्यातील स्थानिक कलाकारांनी ही शॉर्ट फिल्म निर्माण केली असून सोवेली गावात तिचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


 ध्रुवतारा क्रिएटर्स आणि एन.डी प्रोडक्शन प्रस्तुत गांभिर्य या शॉर्ट फिल्मचे संकलन, लेखन आणि दिग्दर्शन अनिकेत नाचणेकर यांचे आहे. डी.ओ.पी. मितेश गायकवाड तर एडिटर म्हणून नदीम देवळेकर यांनी केले आहे. यात आनंदी नागरगोजे, पंकज चव्हाण, राज सुगदरे आणि दत्तप्रसाद गांगण या स्थानिक कलाकारांनी काम केले असून आपल्या अभिनयाने सामाजिक प्रबोधन केले आहे. सोवेलीचे सरपंच सुरेश दळवी, संपत शिंदे, राहुल साळवी, प्रथमेश घोसाळकर, बालाजी नागरगोजे, हृतिक कदम यांचे सहकार्य लाभले आहे. २१ सप्टेंबर रोजी ही फिल्म प्रसारित करण्यात आली असून दोन दिवसांत हजारों नागरिकांनी ही फिल्म पाहिली आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्गात यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द -

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून लॉक डाऊन चालू आहे. त्याची झळ ग्रामीण भागातही पोहचली आहे. मात्र अनेक महिन्यांचा कालावधी झाल्याने ग्रामीण भागात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. शासन, प्रशासन व आरोग्य विभाग यासाठी अविरत कार्यरत असताना नागरिकांनी स्वतःची जबाबदारी व कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करीत असतात, त्यामुळे मोठ्यांनी योग्य वर्तवणूक ठेवून आपला आदर्श मुलांसमोर उभा करावा असा संदेश अभिनय व संवादाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सद्या ही शॉर्ट फिल्म नागरिकांचे प्रबोधन करीत असून कोरोना महामारीबद्दल जनजागृती होत आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top