esakal | देवरुखात व्यापार्‍याने लावलेल्या अनोख्या फलकाची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुखात व्यापार्‍याने लावलेल्या अनोख्या फलकाची चर्चा

देवरुखात व्यापार्‍याने लावलेल्या अनोख्या फलकाची चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : शुक्रवारी अचानक निर्णय घेवून बाजारपेठ पुर्णपणे लॉकडाउन झाल्याने व्यापारी वर्ग संतापला होता. याचाच उद्रेक म्हणुन एका व्यापार्‍याने फलक लावून अनोखा फंड वापरला. गुरुवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी होती. मात्र शुक्रवारी अचानक उघडलेली दुकाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने बंद करावी लागली. यामुळे व्यापारी वर्गाचा संताप वाढला. ग्राहकांचेही हाल झाले. याच रागातुन एक फलक लिहला गेला.

या फलकावर असे लिहीले आहे की, माननीय जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने दुकान बंद आहे. ग्राहकांनी दुकानासमोर उभे राहु नये. दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधा. माल घरपोच होईल. सोबतच बॅंकेने कर्ज हप्ता वसुलीसाठी तसेच व्यापार्‍यांनीही वसुलीसाठी येवू नये. असा फलक लावुन आपला उद्रेक जाहीर केला आहे. परिसरात हा फलक लक्षवेधी झाला असुन चर्चेचा विषय बनला आहे.