esakal | रत्नागिरी पालिका हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा हवा ; ग्रामपंचायतींशी होणार चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

discussion of ratnagiri increased boundaries with collector in ratnagiri

शहरास जोडल्या जाणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला मागे विरोध दर्शविला होता.

रत्नागिरी पालिका हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा हवा ; ग्रामपंचायतींशी होणार चर्चा

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : पालिकेच्या हद्दवाढीच्या विषयाला पुन्हा हवा मिळू लागली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पालिकेला भेट दिल्यानंतर या विषयाला चालना मिळाली. जवळपासच्या १५ किमी परिघातील १५ ग्रामपंचायतींचा पालिकेत समावेश करून रत्नागिरीत ‘क’ दर्जाची महापालिका बनविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामपंचायतींना विश्‍वासात घेऊन ना हरकत मिळविला जाणार आहे.

पालिकेने आठ वर्षांपूर्वी हद्दवाढ करण्याचा प्रयत्न केला होता. तसा प्रस्ताव पालिकेने १५ किमीच्या परिघात येणाऱ्या ग्रामपंचायतींना दिला होता. युतीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि मुख्याधिकारी एम. व्ही. खोडके यांनी सभेत ठरावाला मंजुरी घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. प्रस्तावामध्ये शिरगाव, मिऱ्या, कुवारबाव, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, खेडशी यासह हातखंबा, सडामिऱ्या, मिरजोळे, खेडशी, झरेवाडी, पोमेंडी, कुवारबाव, नाचणे, भाट्ये, झरेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

हेही वाचा -  सिंधुदुर्गात लस येणार कधी?

इतिहास आणि वर्तमान...!

शहरास जोडल्या जाणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला मागे विरोध दर्शविला होता. प्रस्तावाविरुद्ध सरपंचांची बैठक झाली. त्यांनी संघर्ष समिती स्थापन करून हद्दवाढीला विरोध करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतींच्या निर्णयाला आमदार उदय सामंतांनी पाठिंबा दिला. नंतर हा विषय तिथेच थांबला. आता जिल्हाधिकारी यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावाला चालना दिली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. एका ग्रामपंचायतीने एनओसी दिल्याचेही समजते.
 

"जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पालिकेला भेट देऊन आढावा घेतला. तेव्हा त्यांनी पालिकेच्या हद्दवाढीचा विषय पुढे आणला. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही होईल."

- प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी 

हेही वाचा - भरघोस उत्पन्न देणाऱ्या अमेरिकन फळाची आता कोकणात होणार लागवड -

संपादन - स्नेहल कदम