चिपळूण विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत तिढा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

चिपळूण - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिपळूणवर काँग्रेसने दावा केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय होतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात अदलाबदल होण्याची शक्‍यता आहे. 

चिपळूण - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिपळूणवर काँग्रेसने दावा केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय होतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात अदलाबदल होण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली; पण लोकसभेच्या मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. विभागनिहाय पक्षप्रमुखांच्या बैठका घेऊन रणनीती ठरवली जात आहे. काँग्रेसच्या पातळीवरही अशीच तयारी सुरू असून, पहिल्या टप्प्यात दोन्ही काँग्रेसच्या महाआघाडीत शेकाप, जनता दल, स्वाभिमानी, मनसे हे पक्ष सहभागी होतील, त्यानुसारच जागावाटपाचा फॉर्म्युला दोन्ही काँग्रेसमध्ये निश्‍चित झाला आहे.

विधानसभेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. २८८ पैकी २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले. जिल्ह्यातील गुहागर, दापोलीत ‘राष्ट्रवादी’चे आमदार आहेत. या दोन जागा वगळता रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणसाठी रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसने राजापूर आणि चिपळूण या दोन जागा मागितल्या आहेत. राजापूरमध्ये काँग्रेसची ताकद आहे. तेथे ‘राष्ट्रवादी’ची फारशी ताकद नाही. त्यामुळे रत्नागिरीसह राजापूर मतदारसंघ काँग्रेसला सोडला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, चिपळूणवरून काँग्रेस-‘राष्ट्रवादी’त तेढ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहील. पक्ष पुन्हा एकदा मला संधी देईल. या अपेक्षेने माझे काम सुरू आहे.
- शेखर निकम, 

प्रदेश सरचिटणीस

निकमांची मेहनत वाया जाईल
मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून निकम विधानसभेच्या तयारीला लागले होते. मतदारसंघात त्यांनी चांगली बांधणी केली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यास निकमांची मेहनत वाया जाईल. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडू नये, अशी मागणी कार्यकत्यांकडून सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute in Congress - NCP on Chiplun assembly constituency