कोकण : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर ; कारभार भोंगळ असल्याचा ठपका

district health officer working not good in ratnagiri complaint register
district health officer working not good in ratnagiri complaint register

रत्नागिरी : तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पंचायत समितीची बैठक गाजली. कोतवडे पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लेले पावस पीएचसीला काम करत आहेत. तशी तोंडी नियुक्ती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली; मात्र लेखी दिल्याची खोटी माहिती आरोग्य अधिकारी देत आहेत. विनाकारण त्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २ मेमो दिले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा कारभार भोंगळ आहे. डॉ. लेले यांना कोतवडे येथे नियुक्ती देऊन पावसला कायम अधिकारी द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी सभागृहात केली. 

पंचायत समितीची मासिक सभा काल (5) रोजी उपसभापती दत्तात्रय मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पाटील यांनी डॉ. अनिरुद्ध लेले यांच्या चुकीच्या नियुक्तीचा विषय सभागृहापुढे ठेवला. डॉ. लेलेंची तोंडी की लेखी नियुक्ती आहे, या प्रश्‍नावर तालुका अधिकाऱ्यांनी लेखी आदेश असल्याचे सांगितले. यावर पाटील म्हणाले, सभापती तुम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना आणि डॉ. लेलेंना फोन करा. वस्तुस्थिती लक्षात येईल. पावसला प्राथमिक आरोग्य केंद्रालाही कायमचा वैद्यकीय अधिकारी मिळावा, याची मागणी सदस्य सुनील नावले यांनी केली. डॉ. कांबळे १५ दिवस सांगून २ महिने रजेवर आहेत. ते हजर होणार की नाहीत, ती माहिती द्या. सभापतींनी बैठक घेऊन डॉ. लेले यांना कोतवडे येथे नियुक्तीच्या ठिकाणी हजर करावे आणि पावसलाही कायमचा वैद्यकीय अधिकारी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

चांगले काम करणाऱ्या डॉक्‍टरला चुकीची वागणूक 

कोतवडे हे २८ गावांचे आरोग्य केंद्र आहे. तेथे एकच आरोग्य अधिकारी होता. डॉ. लेले यांची तिथे नियुक्ती झाली आहे; मात्र पावस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे १५ दिवसाच्या रजेवर गेल्यामुळे डॉ. लेले यांची पावसला तोंडी नियुक्ती केली. ते प्रामाणिकपणे बारा तास काम करतात; मात्र ते रात्री पावस येथे राहात नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २ वेळा त्यांना मेमो काढला, हे चुकीचे आहे. चांगले काम करणाऱ्या डॉक्‍टरला अशी चुकीची वागणूक देत आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com