Doctor On Call चा रत्नागिरीकरांना आधार; होम आयसोलेशनमधील रुग्णांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor On Call चा रत्नागिरीकरांना आधार; होम आयसोलेशनमधील रुग्णांना दिलासा

Doctor On Call चा रत्नागिरीकरांना आधार; होम आयसोलेशनमधील रुग्णांना दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यातही कोरोना (ratnagiri district) रुग्णांची संख्या वाढत आहे व त्यामुळे डॉक्‍टर्स, दवाखाने यांच्यावरील ताण वाढला आहे. याचा विचार करून जिल्हा परिषदेने (zilha parishad ratnagiri) अभिनव प्रयोग सुरू केला आहे. होम आयसोलेशनमध्ये (home isolation) असणाऱ्या सर्व कोरोना रुग्णांसाठी टेलिफोनिक ओपीडी म्हणजेच ‘डॉक्‍टर ऑन कॉल’ (doctor on call) ही सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसात ४ हजार ९३२ एवढ्या रुग्णांनी लाभ घेतला आहे. (doctor on call activity useful for home isolation patients in ratnagiri)

जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यातील गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या दोन हजार आहे. होम आयसोलेशनमधील नागरिकांनी स्वत:ला व स्वत:च्या काळजीसाठी समर्थ राहावे, असा उद्देश ठेवून टेलिफोनिक ओपीडी (telephonic OPD) म्हणजेच डॉक्‍टर ऑन कॉल ही योजना सुरू केली आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांशी संपर्क होत नसल्यास किंवा कोरोनाबाबत काही शंका असल्यास तसेच आपली कोविड टेस्ट पॉझिटिव्ह (covid-19 positive) आली असेल तर तातडीने या टेलिफोनिक ओपीडीशी संपर्क साधावा. या ठिकाणी एकूण पाच डॉक्‍टर व चार समुपदेशक तत्काळ सेवेसाठी उपलब्ध ठेवले आहेत.

हेही वाचा: रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनबाबतचा निर्णय गुरुवारी

जिल्ह्यातील अनेक नागरिक जे याचा लाभ घेत आहेत, त्यामध्ये होम आयसोलेशन व्यतिरिक्त रुग्णांनाही उपचार दिले जातात. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या काही तक्रारी असतील, जसे की होम आयसोलेशन कीट (isolation kit) मिळाले की नाही किंवा इतर अनुषंगिक बाबी त्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून तत्काळ कार्यवाही केली जाते. अनेक होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण या ओपीडीचा पुरेपर फायदा घेऊन बरे झालेले आहेत. इतर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

काम चालते असे ...

प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची यादी प्राप्त होते. सर्व तालुक्‍यामधील या रुग्णांना कॉल केला जातो. यामध्ये लक्षणे, उपचार, आयसोलेशनचे दिवस याविषयी मार्गदर्शन केले जाते. ज्या व्यक्तींना ट्रीटमेंटची आवश्‍यकता आहे, अशा व्यक्तींना व्हॉट्‌सॲपद्वारे उपचाराच्या सूचना दिल्या जातात. आहाराविषयी मार्गर्शन, सहा मिनिटे चालण्याविषयी सूचना, गृहविलगीकरणाविषयी नियमावली याचे मार्गदर्शन केले जाते. दर दोन ते तीन दिवसांनी रुग्णांना फोन करून फॉलोअप्‌ घेतला जातो. या ओपीडीची खास बाब म्हणजे व्हिडिओ कॉल करूनसुद्धा उपचार सांगितले जातात.

हेही वाचा: Video: 'पंतप्रधान होणार का?'; सोनूच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

एक नजर..

  • जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक रुग्ण उपचाराखाली

  • गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या दोन हजार

  • टेलिफोनिक ओपीडी डॉक्‍टर ऑन कॉल ही योजना सुरू

  • व्हिडिओ कॉल करूनसुद्धा उपचाराबाबत देतात सल्ला

  • पाच डॉक्‍टर व चार समुपदेशक तत्काळ सेवेसाठी

Web Title: Doctor On Call Activity Useful For Home Isolation Patients In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ratnagiricovid-19
go to top