
Video: 'पंतप्रधान होणार का?'; सोनूच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं
गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये अभिनेता सोनू सूदने Sonu Sood गरीब मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचं काम केलं. गरजूंसाठी तो जणू 'देवदूत'च ठरला होता. अजूनही विविधा मार्गांनी त्याचं मदतकार्य सुरूच आहे. दिवसरात्र त्याला सतत मदतीसाठी मेसेज आणि कॉल येत असतात. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीची मदत करता यावी, या हेतूने सोनू सूदने त्याचं कार्य अविरत करत आहे. या गडबडीतही तो पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांचीसुद्धा काळजी घेत आहे. सोनूच्या घराबाहेर कडक उन्हात उभ्या असलेल्या फोटोग्राफर्स आणि पत्रकारांमध्ये त्याने स्वत: बाहेर येऊन थंडगार ज्युसचं वाटप केलं. यावेळी एका पत्रकाराने सोनू सूदला पंतप्रधान होणार का, असा प्रश्न विचारला. यावर सोनूने दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. (sonu sood reacts about running post for prime minister of india)
सोनू सूदचं उत्तर-
"जे जसं आहे तसंच ठीक आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे म्हणून आता किमान तुमच्यासोबत उभा तरी राहू शकतोय", असं सोनू म्हणाला. त्याचप्रमाणे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. सोनू सध्या त्याच्या संस्थेमार्फेत अनेकांना मदत करत आहे.
हेही वाचा : 'गाढवांनो, मूर्खांनो..'; ट्रोलर्सना सुनावताना ढासळला सोनू निगमचा तोल
सोनूचं मदतकार्य-
सोनू लवकरच चार ऑक्सिजन प्लान्ट उभारणार आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता पाहता सोनूने एकूण चार राज्यांमध्ये हे प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू लोकांना अन्न धान्य पुरवण्यापासून ते गरीब मुलांना शिक्षण देण्यापर्यंत सोनू सर्व काम करत आहे. सोनूच्या संस्थेसाठी अभिनेत्री सारा अली खानने ऑक्सिजन सिलेंडर्स खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली होती.
Web Title: Sonu Sood Reacts About Running Post For Prime Minister Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..