Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Western Ghats DodaMarg environmental protection : पश्चिम घाट इको-सेन्सिटिव्ह क्षेत्राच्या मसुद्यातून दोडामार्ग तालुका वगळल्याने पर्यावरणीय चिंता वाढली आहे. वनशक्तीने केंद्राला पत्र पाठवून जंगल, जैवविविधता आणि महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरच्या संरक्षणाची मागणी केली.
DodaMarg eco-sensitive area

DodaMarg eco-sensitive area

esakal

Updated on

दोडामार्ग : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाट इको-सेन्सिटिव्ह एरियाच्या मसुदा अधिसूचनेत ‘महाराष्ट्राचे ॲमेझॉन’ म्हणून ओळख असलेला दोडामार्ग तालुका वगळून घोड चूक केली (Western Ghats Conservation) आहे. आधीच रिअल इस्टेटमाफिया येथील पर्यावरणावर नांगर फिरवत आहेत. त्यामुळे वेळीच हस्तक्षेप करून ही चूक सुधारावी, असे पत्र वनशक्ती संस्थेने केंद्रीय पर्यावरण प्रधान सचिव जयश्री भोज यांना पाठवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com