सावंतवाडी : दुहेरी हत्याकांड प्रकरण सोन्याच्या हव्यासापोटीच | crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

सावंतवाडी : दुहेरी हत्याकांड प्रकरण सोन्याच्या हव्यासापोटीच

सावंतवाडी : शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे गूढ उकलण्यात येथील पोलिसांना आज अखेर यश आले आहे. कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी (वय ३४, रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. दागिन्यांच्या हव्यासाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर दोनदा बेपत्ता झालेला तो तरुण हाच आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शहरातील उभाबाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. दोन आठवड्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. या खुनाच्या तपासासाठी अनेकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर याच तरुणाला याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

हेही वाचा: टी२० वर्ल्डकप फायनलचा थरार; काय महत्त्वाचे

चौकशीसाठी बोलाविल्यानंतर कुशल याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेथून त्याला घरी सोडण्यात आले, मात्र पुन्हा तो बेपत्ता झाला. हा प्रकार नऊ नोव्हेंबरला घडला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन आंबोली घाटाजवळ मिळत होते. पोलिसांनी तेथे शोधमोहीम राबवूनही फारसे काही हाती आले नाही. नंतर तो मुंबईत असल्याचे कळाले. त्यावरून त्याला मानखुर्द येथून ताब्यात घेण्यात आले.

आज पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. खानविलकर यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनसाठी त्याने सुरीने दोघींच्या गळ्यावर वार करून खून केले. त्याने लपवून ठेवलेले हत्यार व सोने पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अखंड तपास करत या आधी सुमारे ४० जणांची चौकशी केली होती.

loading image
go to top