टी२० वर्ल्डकप फायनलचा थरार; काय महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टी२० वर्ल्डकप फायनलचा थरार; काय महत्त्वाचे

टी२० वर्ल्डकप फायनलचा थरार; काय महत्त्वाचे

दवाचा परिणाम होणार?

काही दिवसांपूर्वी दुबईतील हवामान फारच उष्ण असल्याने रात्री दव पडत होते, त्यामुळे दुसऱ्या सत्रात गोलंदाजी कठीण होत होती, परंतु आता हवामानात गारवा आला आहे, त्यामुळे दव पडणे फारच कमी झाले आहे.

इतिहास काय?

दुबईतील या स्टेडियमवर विश्‍वकरंडकाचे १२ सामने झाले आहेत. त्यातील ११ सामने दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. (प्रथम फलंदाजी करताना एकमेव विजय न्यूझीलंडने नामिबियावर मिळविलेला आहे). त्यामुळे उद्या नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेणार हे निश्चित आहे.

हेही वाचा: T20 WC : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातही भारत-पाकप्रमाणेच 36 चा आकडा!

हेसुद्धा महत्त्वाचे

  • टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत

  • ऑस्ट्रेलियाला एक अंतिम सामना खेळण्याचा अनुभव

  • २०१० च्या स्पर्धेत मात्र उपविजेतेपदावर समाधान

  • विश्वस्पर्धेत न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियात अखेरची लढत २०१५ मधील एकदिवसीय विश्वकरंडक अंतिम सामन्यात झाली होती. त्यात ऑस्ट्रेलियाचा विजय.

  • २०१९ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतही न्यूझीलंडला उपविजेतेपद.

सामना टाय झाला तर...

अखंड डावात (२०-२० षटके) दोन्ही संघांची समान धावसंख्या झाली तर सुपर ओव्हर खेळविण्यात येईल आणि त्यातही समान धावसंख्या राहिली तर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर्स खेळविण्यात येतील. (२०१९ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत सुपर ओव्हर टाय झाल्यामुळे इंग्लंडने अधिक चौकार मारले होते म्हणून त्यांना विजेते घोषित करण्यात आले होते. त्यामुळे हा नियम आता बदलण्यात आला.)

हेही वाचा: T20 world cup : पात्रता फेरीतील टी-20 सामन्यात द्विशतकी विश्व विक्रम

राखीव दिवस

कोणत्याही कारणामुळे उद्या रविवारी खेळ होऊ शकला नाही तर सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. (सामना पूर्ण होण्यासाठी किमान १०-१० षटकांचा खेळ अनिवार्य).

खेळपट्टीचा अंदाज

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विश्वकरंडक स्पर्धेतला हा १३ वा सामना. सुरुवातीच्या काळात खेळपट्टी संथ होती, पण आता फलंदाजीस उपयुक्त.

न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया

ठिकाण : दुबई, वेळ : सायंकाळी ७.३०

loading image
go to top