कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. 

दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. 

डाॅ. प्रमोद सावंत हे कृषी महाविदयालय दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख असून त्यांच्या नियुक्‍तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कृषी महाविदयालय दापोलीच्या कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष चव्हाण यांची प्रभारी कुलसचिवपदी नियुक्‍ती करण्यात आली होती. कडक शिस्तीचे प्राध्यापक म्हणून ते ओळखले जात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळातच विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. हे आंदोलनही त्यांनी योग्यरित्या हाताळले होते. डॉ. सुभाष चव्हाण 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले.

डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रभारी कुलसचिवपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. डॉ.  सावंत यांनी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे व्यवस्थापक, मुळदे (जि. सिंधुदुर्ग) येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता या पदावर काम केले आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत व कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत हे दोघेही मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून आता विद्यापीठाचे दोन्ही कारभारी सावंतच असल्याने विद्यापीठाचा कारभार कसा चालविला जातो याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Pramod Sawant as Registrar of Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University