Raigad Wildlife: रायगडचे 'मानद वन्यजीव रक्षक' म्हणून डॉ. प्रसाद दाभोळकर यांची नियुक्ती; अलिबागला प्रथमच बहुमान

Wildlife conservation work in Raigad district : रायगडच्या वन्यजीव संरक्षणाला नवे बळ; दीर्घकाळाच्या वन्यप्राणी बचाव, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्याची दखल घेत डॉ. प्रसाद दाभोळकर यांना मानद वन्यजीव रक्षकपद, अलिबाग तालुक्याला पहिल्यांदाच बहुमान
Wildlife Conservationist Dr. Prasad Dabholkar Named Honorary Wildlife Warden for Raigad District

Wildlife Conservationist Dr. Prasad Dabholkar Named Honorary Wildlife Warden for Raigad District

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि मानवी सहजीवनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. प्रसाद दाभोळकर यांची रायगड जिल्हा 'मानद वन्यजीव रक्षक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पदावर महाराष्ट्र वन व महसूल विभागातर्फे डॉ. दाभोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अलिबाग तालुक्याला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com