Dr Sharayu Asolkar accident news
esakal
नांदगाव : मोटार दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ कवयित्री डॉ. शरयू आसोलकर (वय ५९, रा. सावंतवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (वय ४६) गंभीर जखमी झाले. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा उड्डाणपुलावर काल सकाळी साडेसातच्या दरम्यान (Dr Sharayu Asolkar death news) घडली.