खारेपाटण तालुक्‍याचे स्वप्न साकारणार ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

राज्य शासनाने मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली. मागील सरकारच्या कालखंडात नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - खारेपाटण दशक्रोशीतील नागरीकांच्या गेल्या काही वर्षातील स्वतंत्र तालुका मागणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासनाने नव्याने 49 तालुक्‍याची निर्मिती करण्याबाबत हालचाली सुरू केल्या असून लवकरच याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

राज्य शासनाने मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली. मागील सरकारच्या कालखंडात नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. या समितीत विविध पक्षाचे नेते वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांचा समावेश होता. या समितीने 22 नवे जिल्हे आणि 49 नवे तालुके निर्मितीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे.

हेही वाचा - जिद्दी माऊंटेनिरिंगकडून रत्नदुर्गची स्वच्छता 

समितीने लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे त्रिविभाजन करण्याची शिफारस केली आहे. ठाणे जिल्ह्यातून पालघरची निर्मिती झाली. आता कल्याण आणि मिरा भाईंदर असे दोन जिल्हे प्रस्तावित आहेत. कोकणात रत्नागिरीतून मानगड आणि रायगडातून महाड या जिल्ह्यांची निर्मितीबाबत शिफारस आहे. याचबरोबर राज्यातील क्षेत्रफळाने मोठे तालुके विभाजन केले जाणार आहेत. यात गेली काही वर्षे खारेपाटण, तळेरे विभागातील नागरीकांनी स्वतंत्र तालुका निर्मितीची मागणी केली होती. विशेषतः खारेपाटण लगतचे कणकवली आणि वैभववाडी तालुक्‍यातील काही गाव तसेच देवगड तालुक्‍यातील विजयदुर्ग परिसरातील खाडीलगतचे गाव एकत्रित करून हा तालुका स्वतंत्रपणे निर्माण करावा, अशीही मागणी आहे.  

 हेही वाचा - आठ वर्षे झालेल्या बसेस लांब पल्ल्यासाठी बंद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dream Of Kharepatan Taluka Will Come True Sindhudurg Marathi News