शाहूवाडी : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (Kolhapur-Ratnagiri Highway) जुळेवाडी (ता. शाहूवाडी) येथील खिंडीतील वळणावरील अरूंद मोरीवरून चिरा घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळून ट्रकचालक रवींद्र शिवाजी चव्हाण (वय ३८, रा. शहापूर, ता. पन्हाळा) हा जागीच ठार झाला. काल सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात घडला. घटनेची नोंदी शाहूवाडी पोलिसात (Shahuwadi Police) झाली आहे.