Pali News : मुंबई गोवा महामार्गावर चालकांची अनोखी युक्ती! माणगावच्या कोंडीतून सुटकेसाठी 'अपूर्ण बायपास'चा स्मार्ट वापर

माणगाव बायपासचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही काही भागातील मार्गाचे काम अर्धवट आहे. मात्र, रोजच्या कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशांनी यातून सुटकेसाठी स्मार्ट उपाय शोधला.
mangaon uncomplete bypass road use

mangaon uncomplete bypass road use

sakal

Updated on

पाली - मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी आता प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेत आहे. विशेषतः वीकेंडला या भागात लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून बायपासचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असतानाच, आता वाहनचालक आणि पर्यटकांनी या कोंडीतून सुटण्यासाठी एक 'अनोखी युक्ती' शोधून काढली आहे. माणगाव शहरातील मुख्य बाजारपेठेची कोंडी टाळण्यासाठी चालक चक्क अपूर्ण अवस्थेत असलेल्या बायपासच्या मार्गाचा आणि अंतर्गत ग्रामीण रस्त्यांचा वापर करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com