रत्नागिरीत दोघांचा बुडून मृत्यू ; कोल्हापुरातील एकाचा समावेश

drowning death of two boys in ratnagiri
drowning death of two boys in ratnagiri
Updated on

चिपळूण - खेड तालुक्यातील आंबडस येथील धरणात आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती. या तरुणाचा मृतदेह बुधवारी (ता. 24) पाली येथे आढळून आला. तसेच निरबाडे येथे बंदस्थितीत असलेल्या कॉरीमध्ये बुडून एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सुदैवाने तिची बहिण या प्रसंगातून वाचली आहे. 


खेड तालुक्यातील आंबडस येथील धरणात सुरज दिलीप पाटील (वय 29, मुळ रा. कोल्हापूर) हा आपल्या सहकार्‍यासह सोमवारी सायंकाळी आंघोळीसाठी गेला होता. धरणात तो पोहोत असताना तो वाहत गेला. त्यानंतर दोन दिवस त्याचा शोध सुरू होता. अखेर खांदाटपाली येथील उंबरवणे डोहाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस पाटील राजेंद्र गंगाराम महाडीक यांनी पोलिसांना खबर दिली आहे. सूरज हा मुळचा कोल्हापूर येथील असून तो अनेक वर्षे चिपळूण पाग व त्यानंतर शिवाजनगर येथे राहत होता. सध्या लोटे येथील एका नामांकीत कंपनीत नोकरीला होता. बुधवारी सायंकाळी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर येथे मृतदेह नेण्यात आला. या घटनेची चिपळूण पोलिस ठाण्यात नोंद होऊन शुन्य क्रमाकांने ती खेड पोलिसात वर्ग केली आहे.


दुसऱ्या घटनेत निरबाडे येथील मोहल्ल्यापासून सातशे मिटर अंतरावर कॉरी असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. याठिकाणी गावातील काही महिला कपडे धुण्यासाठी जातात. त्याप्रमाणे शफिया अहमद शेख या आपल्या दोन मुली नजराणा अहमद शेख (10) व अर्जिना अहमद शेख (12) यांच्यासमवेत कॉरीच्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी शफिया शेख या कपडे धुवत असताना त्यांच्या दोन्ही मुली कॉरीमध्ये आंघोळीसाठी उतरल्या होत्या. नजराणा शेख हिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. याचवेळी अर्जिना शेख हिने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तीही बुडून गेली. अखेर शेजारील कातकरी समाजाच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अर्जिना शेख हिला वाचविण्यात यश आले. परंतू नजरानाचा बुडून मृत्यू झाला. याबाबत मुलीचे वडील अहमद युसुफ शेख यांनी चिपळूण पोलिसात खबर दिली आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com