सिंधुदुर्गात खनिज उत्खनन करताना दरड कोसळली; एक ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

कळणे - येथे खनिज उत्खनन सुरू असताना दरड कोसळली. यामध्ये उत्खनन करणारे मशीन व त्याचा ऑपरेटर गाडला गेला. यामध्ये परप्रांतिय ऑपरेटर मृत झाला आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.​

कळणे - येथे खनिज उत्खनन सुरू असताना दरड कोसळली. यामध्ये उत्खनन करणारे मशीन व त्याचा ऑपरेटर गाडला गेला. यामध्ये परप्रांतिय ऑपरेटर मृत झाला आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कळणे येथे खनिज उत्खननाचे काम सुरू असताना दरड कोसळली. यात उत्खनन करणाऱ्या मशीनसह ऑपरेटर गाडला गेला. घटना घडताच तेथे बध्यांची गर्दी झाली. पण अधुनमधुन माती कोसळत असल्याने बचाव कार्यात अडथळा आला. तरीही तातडीने माती बाजूला करून ऑपरेटरला बाहेर काढण्यात आले. पण तो त्यात मृत झाल्याचे समजते. हा ऑपरेटर परप्रांतिय असल्याचे समजते. 

दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खनिजाची खाण आहे. गेली काही वर्षे ही खाण वादाच्या भोवऱ्यात आहे. खाण सुरू करण्यास स्थानिकांचा विरोध होता यासाठी करण्यात आलेले आंदोलन राज्यभर गाजले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drum collapsed during Excavation of mining in Sindhudurg