esakal | बापरे..! रत्नागिरीत 'या' शहरात प्रत्येक भागात याचीच बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

due to corona various areas are affected in chiplun

बाधित झालेल्या रुग्णांना आपल्याला बाधा नेमकी कुठे झाली, हे समजत नाही

बापरे..! रत्नागिरीत 'या' शहरात प्रत्येक भागात याचीच बाधा

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचा रुग्ण आहे. अगदी साध्या किरकोळ भाजी विक्री करणाऱ्यांपासून श्रीमंतालाही कोरोनाची बाधा झाली. त्यात लोकप्रतिनिधी, डॉक्‍टर, पोलिस यांचाही समावेश आहे. मात्र, बाधित झालेल्या रुग्णांना आपल्याला बाधा नेमकी कुठे झाली, हे समजत नाही. जेव्हा ताप येतो, कणकण येते, तेव्हाच बाधित झाल्याचे समजते. शहरात बाधितांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा - रत्नागिरी सोडणारे शिक्षकच जास्त; काय होतील परिणाम? 

कोरोनाबाधितांच्या आकड्यात चिपळूण शहर जिल्ह्यात  दुसऱ्या नंबरला आहे. बाधित रुग्णांमध्ये डॉक्‍टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, उद्योजक आढळून येत आहेत. सुरवातीच्या काळात खेर्डी आणि गोवळकोट रोडमधील एका इमारतीपुरता कोरोनाचा उद्रेक झाला होता; मात्र आता त्याने संपूर्ण शहर व्यापले आहे. सर्वाधिक धोकादायक म्हणजे कोरोनामुळे २० जण दगावले आहेत. यातील दहाजण शहरी भागातील तर दहा ग्रामीण भागातील आहेत. बाधित आणि दगावणाऱ्यांचे वय ५० पेक्षा पुढे आहे. बाजारपेठ अनलॉक झाल्यापासून प्रत्येक वॉर्डात रुग्ण आढळत आहेत. 

एक तर घरात बसून करायचे काय? पोटाला खायचे काय? रोजगार उद्योग नसल्याने बाहेर पडावेच लागत आहे. किती जरी काळजी घेतली तरी कोरोना हा चिकटत आहे. तो गरीब - श्रीमंत असा भेद करत नाही; मात्र उपचार घेण्यासाठी श्रीमंत हा खासगी हॉस्पिटलमध्ये तर गरीब हा जिल्हा रुग्णालयात मिळेल, तेथे 
उपचार घेत आहे. 

हेही वाचा - मत्स्य व्यावसायिकांनी फिरवली पाठ ; हे आहे कारण...

"कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापासून वाचायचे असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढविणे हेच यावरचे उपाय आहेत. या संदर्भात लोकांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत."

- नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण

संपादन - स्नेहल कदम 

loading image