Raigad Discovery: किल्ले सरसगडच्या कुशीत लपलेली ‘श्री दातार’ ऐतिहासिक विहीर व शिलालेखाचा दुर्गवेध परिवाराकडून शोध; १४ समाध्यांचाही वारसा उजेडात

किल्ले सरसगडच्या कुशीत लपलेली ‘श्री दातार विहीर’ आणि विस्मृतीत गेलेला शिलालेख दुर्गवेध परिवाराच्या तीन महिन्यांच्या शोधमोहिमेतून पुन्हा प्रकाशझोतात
Heritage Discovery: Durgavedh Parivar Unearths Lost Historical Well Near Sarasgad

Heritage Discovery: Durgavedh Parivar Unearths Lost Historical Well Near Sarasgad

Sakal

Updated on

पाली : येथील किल्ले सरसगडच्या कुशीत दडलेल्या अद्वितीय कालखंडाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक पाऊलखुणा शोधण्यात दुर्गप्रेमींना मोठे यश आले आहे. विख्यात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पूर्वी वाचन केलेला, परंतु काळाच्या ओघात विस्मरणात गेलेला ‘श्री दातार यांच्या विहिरीवरील ऐतिहासिक शिलालेख’ आणि ती विहीर शोधून काढण्यात ‘दुर्गवेध परिवार’ संस्थेला यश आले आहे. सलग ३ महिन्यांच्या अथक शोधमोहिमेनंतर या ऐतिहासिक वारशाला अखेर मोकळा श्वास मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com