शाब्बास! आठ वर्षांच्या दुर्वांकची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ; अडीच मिनिटांत सांगितली दोनशे विषाणूंची यादी

durvank record in world book 200 anti pill in two and half minirus in sindhudurg
durvank record in world book 200 anti pill in two and half minirus in sindhudurg
Updated on

कणकवली (सिंधुदुर्ग) : शहरालगतच्या वागदे-गावठण येथील अवघ्या ८ वर्षांच्या दुर्वांक गुरुदत्त गावडे याने अनोखा जागतिक विक्रम केला आहे. कोल्हापुरातील शांतिनिकेतन प्रशालेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या दुर्वांकने २०० विषाणूंची यादी तयार केली. या विषाणूंची अवघड नावे त्याने अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदामध्ये सांगून विश्वविक्रम केला. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.  

वागदेचे रहिवासी असलेले गावडे कुटुंबीय तीन वर्षांपासून नोकरी निमित्ताने कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात परिचारिका असणाऱ्या आई वंदना गावडे आणि खासगी वाहनावर चालक असणारे वडील गुरुदत्त यांच्या प्रोत्साहनाने दुर्वांकने या उपक्रमाची तयारी केली.

विज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ. संजीवनी माने यांच्या मार्गदर्शनाखाली रोगजनक विषाणूंच्या नावांचे संकलन करण्यासाठी गुगल तसेच विज्ञानाची पुस्तकांचे संदर्भ घेतले. सुमारे २०० विषाणूंची यादी तयार केली. या नावांचे पाठांतर करून ती अवघ्या २ मिनिटे ३७ सेकंदांत म्हणून दाखवत हा अनोखा विक्रम केला. याबद्दल कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्याचा प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com