राष्ट्रीय मतदार दिवस : २५ जानेवारीपासून मिळणार ई-मतदार ओळखपत्र

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

डीजी लॉकरवर पीडीएफ म्हणून अपलोड करू शकतो किंवा मुद्रित करू शकतो.

रत्नागिरी : अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने २५ जानेवारी २०२१ रोजी ई मतदार ओळखपत्र (e-EPIC) तयार करून प्राप्त करता येणार आहे.
ई-मतदार ओळखपत्र म्हणजे ई - ईपीक एक सुरक्षित पोर्टेबल कागदपत्र स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. जी मोबाइलवर किंवा संगणकावर स्व-मुद्रण योग्य स्वरूपात डाउनलोड केली जाऊ शकते. मतदार अशा प्रकारे कार्ड मोबाइलवर ठेवू शकतो. ते डीजी लॉकरवर पीडीएफ म्हणून अपलोड करू शकतो किंवा मुद्रित करू शकतो.

डीजिटल फॉरमेटमध्ये पर्यायी दस्ताऐवज म्हणून त्वरित मतदार ओळखपत्र म्हणून उपलब्ध होईल. मतदार ओळखीचा वैध दस्ताऐवज, मतदार आपल्या सोईनुसार त्याची प्रत प्राप्त करू शकेल. तसेच मतदार स्वत: करु शकतो. प्राथमिक स्तरावर २५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मतदार नोंदणी झालेल्या मतदारांना त्याचा लाभ मिळणार आहे. १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व मतदारांना ही सेवा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा - कर्करोगांवरील त्रासदायक उपचाराला पर्याय:  डॉ. विश्‍वजित खोत यांचे संशोधन

ई- मतदार ओळखपत्र खालील संकेतस्थळावरुन प्राप्त करता येतील. मतदार पोर्टल, मतदार हेल्पलाईन मोबाइल ॲप किंवा एनव्हीएसपी वरून ई-ईपीक डाउनलोड करू शकता. मतदार पोर्टल http://voterportal.eci.gov.in, एनव्हीएसपी: https://nvsp.in चा उपयोग करुन ई मतदार ओळखपत्र मोबाईलवर घेता येईल.

ई-ईपीकसाठी हे पात्र मतदार पात्र

वैध ईपीक क्रमांक असलेले सर्व सामान्य मतदार १ जानेवारी २०२१ या दिनांकापर्यंत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत असला पाहिजे. सर्व नवीन मतदारांना आणि ज्यांचा मोबाईल नंबर अर्ज करताना दिलेला असेल, त्यांना एसएमएस मिळेल. ते २५ ते ३१ जानेवारी दरम्यान ई-ईपीक डाउनलोड करू शकतील. इतर सामान्य मतदार १ फेब्रुवारी २०२१ पासून ई-ईपीक डाउनलोड करू शकतील.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: e Epic received for 25 january for voters in digital platform in ratnagiri