

Ganesh Visarjan in Artificial Tank Barskar Family in Pali Continues Six Year Eco Friendly Ganesh Festival Tradition
esakal
-अमित गवळे
पाली: पालितील सुजित बारसकर व कुटुंबीय यांनी मागील सहा वर्षांपासून जोपासलेली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात व निष्ठेने कायम ठेवली आहे. शनिवारी (ता. १९) त्यांनी शाडूच्या मातीपासून साकारलेल्या आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन पाली येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर उभारलेल्या कृत्रिम पाण्याच्या टाकीत अत्यंत भक्तिभावाने पार पाडले.