esakal | पर्यावरणपूरक मूर्तीद्वारे करणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

पर्यावरणपूरक मूर्तीद्वारे करणार मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : येथील १३ वर्षाची मुलगी सई कोतकुंडे व तिच्या मैत्रिणींनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविल्या आहेत. गणेशमूर्ती विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून पुरात शैक्षणिक साहित्य भिजले, त्यांना ते मदत करणार आहेत. चिपळुणात महापूर आल्यानंतर मधुमेहतज्‍ज्ञ डॉ. सुनील कोतकुंडे आणि त्यांची पत्नी डॉ. श्रृतिका कोतकुंडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. प्रसिद्धीपासून लांब राहून त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्यांची मुलगी सई कोतकुंडे हिने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पूरग्रस्त मित्रांना मदतीचा हात पुढे केला आहे.

चिपळूण शहराची गरज लक्षात घेऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागातील अनेक डॉक्टर शहरात आले. नागरिकांना सेवा देत असताना काही निवडक डॉक्टरांनी समाजसेवेचा भागही निवडला. कोतकुंडे दांपत्य समाजसेवेसह आपत्तीच्या काळात शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी धावले. चिपळूण शहर आणि उपनगर भागात प्रामुख्याने ज्यांना मदत मिळाली नाही, अशा लोकांना शोधून डॉ. कोतकुंडे दांपत्याने जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्यांचा आदर्श सई कोतकुंडेने घेतला. आपल्या मित्र-मैत्रिणींना मदत करूया, असा निर्णय सईने घेतला.

मित्रांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणार

दरम्यान, सई कोतकुंडेसह आदिती पवार, शौर्य मोहिते, वैभवी मोहिते, प्राची जोगळेकर एकत्र आले. त्यांनी मित्रांच्या घऱी जाऊन स्वच्छतेची कामे केली. आपल्या मित्रांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना मदत करण्याच्या हेतूने त्यांनी खाऊच्या पैशाचा उपयोग करून गणपती आणि मखर बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणले. गणपती साचा आणि शाडूची माती वापरून पर्यावरणपूरक गणपती बनवले. ते रंगवून तयार केले तसेच मखरही बनविले. या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि मखरांची विक्री सध्या सुरू आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून ही मुले आपल्या मित्रांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार आहेत.

हेही वाचा: दुर्मिळ मासा लागला गळाला; नौका मालक रातोरात झाला लखपती

ही केली कामे

  1. मित्रांच्या घरी जाऊन केली स्वच्छतेची कामे

  2. गणपती, मखर बनविण्यासाठीचे साहित्य केले खरेदी

  3. मदत करण्याच्या हेतूने खाऊच्या पैशाचा उपयोग

  4. साचा, शाडूच्या मातीतून बनवले पर्यावरणपूरक गणपती

  5. गणेशमूर्ती आणि मखरांची विक्री सध्या सुरू

loading image
go to top