esakal | दुर्मिळ मासा लागला गळाला; नौका मालक रातोरात झाला लखपती
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्मिळ मासा लागला गळाला; नौका मालक रातोरात झाला लखपती

दुर्मिळ मासा लागला गळाला; नौका मालक रातोरात झाला लखपती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हर्णै : लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णै बंदरात एकाच घोळ माशाचा लिलाव दोन लाख रुपयांना झाला असून, संबंधित नौकामालक रातोरात लखपती झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हर्णै बंदर हे मासेमारी लिलावासाठी प्रसिद्ध आहे तर हेच बंदर पुन्हा एकदा घोळ जातीच्या एका माशाचा लिलावामुळे चर्चेत आले आहे. दोन लाख रुपयांना माशाचा लिलाव झाला आहे आणि त्यामुळे बोट मालकाचे नशीब चांगलेच फळफळले आहे. काल (ता. ६) लिलावात एमएम फिशरीज कंपनीने हा मासा दोन लाख रुपये मोजून खरेदी केला आहे. या माशाचा लिलाव दोन लाख रुपये झाल्याने बोट मालकाबरोबरच अनेक मच्छीमारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ज्यांच्या जाळ्यात पडेल, तो मच्छीमार लखपती...

दुर्मिळ असणारा हा मासा क्वचितच आढळून येतो. हा मासा सहसा मच्छीमारांच्या जाळ्यात मरत नाही. परंतु, ज्यांच्या जाळ्यात हा मासा पडेल, त्याला तो लखपती बनविल्याशिवाय राहत नाही. माशाची किंमत ऐकून बहुतांश ग्रामस्थांना आश्चर्य वाटले आहे. हा मासा औषधी गुणधर्म असलेला आहे. त्याच्या शरीरामधला भाग ऑपरेशनचा दोरा बनवण्यासाठी वापरला जातो आणि त्याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे या माशाला भरपूर किंमत असते.

हेही वाचा: रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना

तरेही एका रात्रीत करोडपती...

यापूर्वी असाच प्रकार पालघर जिल्ह्यातून समोर आला होता. येथील मच्छीमार चंद्रकांत तरे यांना मासेमारी करताना १५० हून अधिक घोळ जातीचे दुर्मिळ मासे सापडले. या माशांची बाजारात विक्री झाल्याने ते एका रात्रीत करोडपती बनले होते.

loading image
go to top