सिंधुदुर्गच्या इको-फ्रेंडली राख्या जाणार आता परदेशात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तुंना पर्यावरण पूरक वस्तू निर्माण करून पर्यावरण स्नेही लोक निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.

सिंधुदुर्गच्या इको-फ्रेंडली राख्या जाणार आता परदेशात

मालवण : येथील स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुबक इको-फ्रेंडली राख्यांची परदेशातील भारतीयांनाही भुरळ पडली आहे. नारळाच्या करवंटीपासून बनविलेल्या या राख्यांना परदेशात मागणी वाढल्याने राख्या जगभरातील देशात पाठवल्या गेल्या आहेत. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यावरण या विषयाचे प्राध्यापक हसन शेख आणि त्यांचे विद्यार्थी विकल्प या ब्रँड खाली राख्या तयार करत आहेत.

निसर्ग हा सदैव मानवास मदत करण्यास उभा असतो. पण आपण फक्त त्याचा गैरवापर करतो. निसर्गावर आपण फार आघात केले आहेत की, स्वतःलाच संकटात टाकत आहोत. दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक वस्तू वापरतो की ज्या निसर्गावर आघात करतात, पर्यायाने त्याचा परिणाम आपल्याच जीवनावर होतो. अनेक वेळा आवाज ऐकायला मिळतो की, पर्यावरण घातक वस्तूंना पर्याय नाही म्हणून आम्ही त्या वस्तू वापरतो. याच मुद्द्याचा विचार करून प्रा. खान यांनी या आघात करणाऱ्या वस्तुंना पर्याय आणण्याचा विकल्प या हरित व्यवसायातून प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: कोल्हापूर - सावर्डेतील 'त्या' बेपत्ता बालकाची हत्या

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तुंना पर्यावरण पूरक वस्तू निर्माण करून पर्यावरण स्नेही लोक निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ मोठ्या प्रमाणात परंतु त्याच्या करवट्यांचा योग्य वापर केला जात नव्हता. चुलीमधील इंधन म्हणूनच जास्त वापर. याचा विचार करून आठ रुपये प्रति किलोने आम्ही करवंट्या घेऊन लोकांच्या चुलीमधून करवंट्या बाहेर काढल्या. करवंटीतून अनेक हरित वस्तूंची निर्मिती केली आहे. यातून कार्बन फुटप्रिंट तर कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्लास्टिकला पर्यायी वस्तू देखील लोकांपर्यंत पोहोचतील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे.

निसर्गाच्या अस्तित्वावर, आपले अस्तित्व अवलंबून आहे. पण प्लास्टीकच्या विळख्यात आपण स्वतःला अडकून ठेवले आहे. प्लास्टिकला पर्याय शोधणे ही विकल्पची प्राथमिकता आहे. अशा पर्यावरण पूरक वस्तू आम्ही आपणांसमोर आणत राहू. निसर्गाचे न फेडता येणाऱ्या ऋणातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात सर्वांची सदैव साथ लाभेल अशी आशा प्रा. खान यांनी व्यक्त केली आहे. मुलांमध्ये अनेक सुप्त कलागुण आणि कौशल्य असतात. पण महाविद्यालयीन अभ्यासक्रमात हे बहरणे शक्य नसते. अशा कौशल्यपूर्ण प्रामाणिक मुलांचा शोध घेऊन, त्यांना प्रा. खान यांनी स्वतः प्रशिक्षण दिले आणि त्यांचे कौशल्य बहरून आणण्यासाठी सुरू केली हुनर की पाठशाळा.

हेही वाचा: खासदार राऊतांकडून कोत्‍या मनोवृत्तीचे दर्शन; जठारांकडून टीका

आज ते आणि त्यांची पत्नी अमरीन खान आणि नवनीत मेस्त्री, पायल शिरपूटे, मधुरा ओरसकर, अजय आळवे आदी मुले यामध्ये समाविष्ट आहेत. या राख्या नारळाच्या करवंटीचा वापर करून निर्मिती केलेल्या आहेत. तर राख्यांमध्ये बिया म्हणजे रक्षाबंधन नंतर कुंडीमधून किंवा मातीखाली घातल्यावर काही दिवसात त्यामधून झाड येईल. (बिया फुलपाखरांचे नेक्टर प्लांटच्या आहेत) तर नारळाच्या झावळ्यापासून राखीसाठी इको पॅकिंग बॉक्स करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून या राख्यांना मागणी असून गोवा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांसोबत लंडन मध्येही राख्या पाठविण्यात आल्या आहेत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या आणि सुव्यवस्था राखणाऱ्या सैनिकांना, आर्मी चीफ, राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांना देखील या राख्या विकल्पने पाठविल्या आहेत असे प्रा. खान यांनी सांगितले.

बाजारात विक्रीसाठी असलेल्या इतर राख्या सुंदर दिसण्यासाठी त्यावर चकाकणारे मणी लावलेले असतात. मात्र, मेळघाटातील या राख्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या राख्यांमध्ये बीज टाकलेले आहे. त्यामुळे ही राखी खराब झाल्यावर कुठे फेकली तर या राखीत टाकलेले बीज जमिनीत रोवले जाते. त्यानंतर त्याचे झाड तयार होते. बाजारात इको फ्रेंडली राख्यांना खुप मोठी मागणी आहे.

हेही वाचा: 'भाजप'च्या तगड्या राणेंविरोधात सेनेच्या दोन वाघांची लागणार वर्णी?

Web Title: Eco Friendly Rakhi Demanding Foreign Country From Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raksha Bandhan 2021