माजी सैनिकाच्या कुटुंबावर झाला विषप्रयोगाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

चिपळूण - शिरळ-मोरेवाडी येथील माजी सैनिकाच्या घराचा दरवाजा उघडून घरातील विविध धान्यांच्या िपठासह तेल, िमठामध्ये  विषारी पावडर टाकून या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हे कुटुंब बाहेरगावी गेले असता अज्ञाताने हे कृत्य केले.

चिपळूण - शिरळ-मोरेवाडी येथील माजी सैनिकाच्या घराचा दरवाजा उघडून घरातील विविध धान्यांच्या िपठासह तेल, िमठामध्ये  विषारी पावडर टाकून या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हे कुटुंब बाहेरगावी गेले असता अज्ञाताने हे कृत्य केले.

दीपाली महाडिक यांनी बुधवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. महिनाभरापूर्वी दुर्घटना घडवण्यासाठी त्यांच्या घरातील गॅसही सुरू ठेवण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

महाडिक यांचे सासरे (कै.) रघुनाथ महाडिक हे माजी सैनिक होते. दीपाली महाडिक यांच्यासह  कुटुंबात पती, दोन मुले व सासू आहे. १३ फेब्रुवारीला घरात कोणीही नसताना अज्ञाताने मागील दरवाजा उघडून गॅस सुरू करून ठेवला होता. हा प्रकार घरात आल्यावर महाडिक यांच्या लक्षात आला. दरवाजा चुकून उघडा राहून गॅसही सुरू राहिला असेल, असे त्यांना वाटले. त्यामुळे या घटनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र ७ मार्चला हे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले होते, ते ११ मार्चला रात्री ११ वाजता परतले. यावेळीही मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला.

किचनमधील प्रत्येक वस्तूला वास येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अगदी मिठापासून ते अन्न बनविण्याच्या विविध पीठांचे डबे उघडून पाहिले असता त्यात विषारी पावडर टाकल्याचे व त्यास वास येत असल्याचे लक्षात आले. दोन्ही वेळचा प्रकार कोणीतरी जीवे मारण्याच्या हेतूने करीत असल्याचे सौ. महाडिक यांची खात्री झाल्याचे त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दोन वेळा घडलेल्या प्रकारामुळे हे कुटुंब सध्या भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या प्रकाराने गावातही खळबळ उडाली आहे. महाडिक कुटुंबाने पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

या प्रकरणी माजी सैनिकाच्या घरातील अन्न बनविण्याच्या पदार्थांमध्ये सापडलेली पावडर विषारी आहे का, याची प्रथम तपासणी केली जाईल. ती खरोखर विषारी असेल, तर ती का मिसळण्यात आली, हे कृत्य कोणी केले, याची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल.
- देवेंद्र पोळ,
पोलिस निरीक्षक

Web Title: Efforts to exploit former soldier family